Delhi Murder: राजधानी पुन्हा हादरली! आणखी एका खुनाचा उलगडा, हत्येनंतर तरुणीचा मृतदेह फ्रीजमध्ये लपवला...

Delhi murder case : श्रद्धा हत्याकांडातून राजधानी दिल्ली सावरत असतांना आणखी एका क्रूर हत्याकांडाचा उलगडा झाला आहे.  दिल्लीतील प्रेमप्रकरणावरून तरुणीची हत्या करण्यात आली. त्यानंतर तरुणीचा मृतदेह फ्रीजमध्ये लपवला.  

Updated: Feb 14, 2023, 04:19 PM IST
Delhi Murder: राजधानी पुन्हा हादरली! आणखी एका खुनाचा उलगडा, हत्येनंतर तरुणीचा मृतदेह फ्रीजमध्ये लपवला...  title=

Delhi Murder: श्रद्धा हत्याकांडातून (shraddha murder case) राजधानी दिल्ली सावरत असतांना आणखी एका क्रूर हत्याकांडाचा उलगडा झाला आहे. तब्बल 6 महिन्यांनंतर हे खून प्रकरण उघडकीस आले आहे. दिल्लीतील नजफगढ भागात एका मुलीची हत्या केल्यानंतर तिचा मृतदेह ढाब्याच्या रेफ्रिजरेटरमध्ये लपवून ठेवण्यात आला होता.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून ढाब्यातून मृतदेह बाहेर काढला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हत्येतील आरोपीचे नाव साहिल गेहलोत असून त्याचा शोध सुरू आहे. ही घटना नजफगडमधील मित्राव गावात घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार,  तरूणी ही आरोपीची मैत्रीण होती. काही दिवसांपूर्वी आरोपी गेहलोतचे दुसऱ्या मुलीसोबत लग्न ठरले होते. त्यामुळे आरोपीने तरुणीची हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. 

वाचा: स्पॅम कॉलमुळे त्रस्त आहात ? मग 'या' टिप्स फॉलो करा 

आफताबने श्रद्धाचा मृतदेहही फ्रीजमध्ये लपवला होता

श्रद्धा हत्याकांडातील आरोपी आफताब यानेही श्रद्धाचा मृतदेह (shraddha murder case) फ्रीजमध्येच लपवून ठेवला होता. श्रद्धा खून प्रकरणाच्या तपासादरम्यान पोलिसांना समजले की, श्रद्धाची हत्या केल्यानंतर आफताबने मृतदेह लपवण्यासाठी मृतदेहाचे अनेक तुकडे केले होते. श्रद्धाचा मृतदेह कापण्यापूर्वी आफताबने नवीन फ्रीज विकत घेतला होता.