तीसरा कौन? 'त्या' गोष्टीवरुन भांडण झालं आणि आफताबने श्रद्धाचे 35 तुकडे केले, मोठा खुलासा

प्रेम, भांडण, हत्या आणि कट... श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात नवा खुलासा, आफताब पुनावालाने त्या कारणावरुन केली श्रद्धाची हत्या

Updated: Jan 25, 2023, 03:36 PM IST
तीसरा कौन? 'त्या' गोष्टीवरुन भांडण झालं आणि आफताबने श्रद्धाचे 35 तुकडे केले, मोठा खुलासा title=

Shraddha Walkar Murder Case : श्रद्धा वालकर हत्ये प्रकरणातील चार्जशीटमध्ये (Chargesheet) पोलिसांनी मोठा खुलासा केला आहे. श्रद्धाची हत्या केल्यानंतर आरोपी आफताब पुनावालाने (Aftab Amin Poonawala) श्रद्धाच्या मृतदेहाचे 35 तुकडे केले. आफताबने श्रद्धाची इतकी निर्घृण हत्या का केली याचं कारण जवळपास स्पष्ट झालं आहे. पण पोलिसांसमोर प्रश्न आहे तो श्रद्धा आणि आफताबमधला तिसरा व्यक्ती कोण? या व्यक्तीमुळे श्रद्धा आणि आफताबमध्ये जोरदार भांडण झालं आणि त्यानंतर आफताबने श्रद्धाला मारहाण केली त्यानंतर तिची गळा दाबून हत्या केली.

अॅपवरुन झाली ओळख?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार श्रद्धा वालकर आपल्या मोबाईलमध्ये बंबल अॅप (Bumble App) नावाचं एक अॅप्लीकेशन वापरत होती. हे एक डेटिंग अॅप आहे. या अॅपवरुन दोन अनोळखी व्यक्ती मैत्री करतात. या बंबल अॅपवरुनच श्रद्धाची ओळख हरियाणातील गुरुग्राममध्ये राहणाऱ्या एका तरुणाशी झाली होती. 

त्या तरुणाला भेटायाल गेली होती श्रद्धा
17 मे 2022 ला श्रद्धा त्या तरुणाला भेटायला गुरुग्रामला (Gurugram) गेली होती, अशी माहिती पोलिसांनी दिली. श्रद्धा सकाळी आपल्या राहत्या घरातून बाहेर निघाली. पण तो पूर्ण दिवस ती घरी परतली नाही. कदाचित तीने आफताबच्या फोनलाही प्रतिक्रिया दिली नाही. दुसऱ्या दिवशी म्हणजे 18 मे 2022 ला सकाळी साधारण 11 वाजता श्रद्धा दिल्लीतल्या छतरपूर इथल्या आपल्या घरी परतली. 18 मे रोजी श्रद्धा घरी आल्याचं सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना सापडलं आहे. 

आधी भांडण नंतर हत्या
श्रद्धा घरी परत आल्यानंतर आफताब प्रचंड रागात होता. त्याने श्रद्धाला रात्रभर का परतली नाहीस याचा जाब विचारला. पण श्रद्धाने यावर काही उत्तर दिलं नाही. त्यामुळे संतापलेल्या आफताबने श्रद्धाला प्रचंड मारहाण केली. त्यानंतर काही वेळा परिस्थिती शांत झाली. दोघांनी एकत्र जेवण केलं. काही वेळाने याच विषयावरुन दोघांमध्ये पुन्हा भांडण झालं आणि आफताबने रागाच्या भरात श्रद्धाचा गळा आवळत तिची हत्या केली. यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्याने 35 तुकडे केले. त्यानंतर ते तुकडे दिल्लीच्या मेहरोली जंगलात फेकून दिले.

पोलिसांनी स्थापन केली 9 पथकं
या प्रकरणाच्या तपासासाठी पोलिसांनी 9 पथकं स्थापन केली. याशिवाय एसाईटीही गठित करण्यात आलीय. केवळ दिल्लीच नाही तर चार राज्यात या प्रकरणाचा तपास सुरु आहे. दिल्लीशिवाय महाराष्ट्र, हरियाणा आणि हिमाचल प्रदेशचा समावेश आहे. पोलिसांनी मेहरोलीच्या जंगलातून श्रद्धाच्या शरीराच्या काही तुकडे जप्त केले आहेत. तपासात फॉरेन्सिक टीमसचाही समावेश करण्यात आला आहे. 

अनेक पुरावे गोळा केले
पोलिसांनी आफताबची नार्को आणि पॉलीग्राफ टेस्ट केली आहे. तसंच गुरुग्रम आणि दिल्लीतून काही सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांच्या हाती लागलं आहे. याशिवाय आफताबचा लॅपटॉप आणि सोशल मीडियावरुन काही पुरावे गोळा करण्यात आले आहेत. श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे करण्यासाठी वापरण्यात आलेल्या शस्त्रांपैकी काही शस्त्र जप्त करण्यात आली आहेत. याशिवाय 150 हून अधिक साक्षीदारांचा जबाब नोंदवण्यात आला आहे. याचा उल्लेख चार्जशिटमध्ये करण्यात आला आहे.

श्रद्धाच्या हत्येचं कारण?
पोलिसांनी चार्जशीटमध्ये केलेल्या नोंदीनुसार 17 मे 2022 रोजी श्रद्धा बंबल अॅपवरुन झालेल्या मित्राला भेटायला गुरुग्राम इथं गेली होती. 18 मे 2022 रोजी ती घरी परतली. यावरुन आफताब नाराज होता, त्यानंतर त्या दोघांमध्ये भांडण झालं आणि आफताबने तिची हत्या केली. दरम्यान या प्रकरणात आफताबची बाजू मांडणाऱ्या वकिलावर आफताब नाराज असल्याची माहिती समोर आली आहे. चार्जशीटमध्ये कोणत्या गोष्टी लिहिण्यात आल्यात त्या आपल्या वकिलाला दाखवू नयेत असं सांगितलं आहे. इतकंच नाही तर आपला वकिल बदलण्याची विनंतीही त्याने केल आहे. आफताबच्या न्यायालयीन कोठडीत 7 फेब्रुवारी 2023 पर्यंत वाढ करण्यात आली आहे.