Shraddha Walker Case : श्रद्धा हत्या प्रकरणात मोठी माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फैझल मोमीन नावाच्या अमली पदार्थ तस्कराला सुरत गुन्हे शाखेने अटक केली आहे. फैजल हा वसईचा रहिवासी आहे. पोलिसांना संशय आहे की, फैझल आफताब राहत असलेल्या परिसरात सतत येत होता. एवढंच नाहीतर, फैझल आफताबला ड्रग्जही पुरवत असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. दिल्लीतील श्रद्धा हत्याकांडाचा तपास दिल्ली पोलीस करत आहेत. या तपासात रोज नवीन खुलासे समोर येत आहेत. आता ड्रग्स तस्कर समोर आल्यामुळे तपासाला वेगळी दिशा मिळाली आहे.
श्रद्धा हत्या प्रकरणी पोलिसांकडून जवळपास 14 पथकं तयार कण्यात आली आहेत. याप्रकरणी पोलिसांनी आफताबच्या वडिलांचीही चौकशी केली आहे. पोलीसांनी आफताबच्या वडिलांना तो ड्रग्स घेत होता का? हा प्रश्न देखील विचारला. आफताबला अटक केल्यानंतर पोलिसांनी त्याच्या वडिलांना दिल्लीला बोलावलं.
श्रद्धाचे 35 तुकडे करून आफताबने तिच्या प्रेमाचा अंत केला. एवढंच नाहीतर आफताबने पोलिसांसमोर त्याचा गुन्हा कबूल देखील केला आहे. श्रद्धा हत्या प्रकरणातील आरोपी आफताब पुनावाला (Aaftab Poonawala) याला कोर्टाने 13 दिवसांची न्यायालयीन कोठडी (Judicial Custody) सुनावली असून त्याची रवानगी तिहार जेलमध्ये (Tihar Jail) करण्यात आली आहे.
जेलमध्ये आफताब टेन्शन फ्री
श्रद्धा हत्या प्रकरणात आफताबची कसून चौकशी सुरु आहे. पण आफताब पोलिसांना उटल सुलट उत्तर देत असल्याचं दिसून आलं आहे. आता त्याची रवानगी तिहार जेलमध्ये करण्यात आली आहे. (shraddha walker latest news) पण जेलमध्येही त्याच्या चेहऱ्यावर पश्चातापाचे किंवा तणावाचे कोणतेच भाव दिसून आले नाहीत. उलट रात्री आफताब ब्लँकेट घेऊन आरामात झोपला.
मिळालेल्या माहितीनुसार, आफताब चौकशीत प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देत नाही. काही प्रश्न विचारल्यानंतर तो शांत बसत आहे. शिवाय काही प्रश्नांना तो टाळत देखील आहे. आता राहिलेल्या प्रश्नांसाठी पोलिस सोमवारी पॉलीग्राफ चाचणी घेणार आहेत. दुसरीकडे, आफताबची नार्को चाचणी ५ डिसेंबरला होऊ शकते... असं सांगण्यात येत आहे. (shraddha walker news)