Shraddha Walker Murder Case : पॉलिग्राफ टेस्टमध्ये आफताबकडून दिशाभूल; 5 पुराव्यांपैकी 'एक' गोष्ट मिळणं कठीण!

Shraddha Walker Murder Case: पॉलिग्राफनंतर पोलिसांची नार्को टेस्टवर नजर; आफताबने गुन्हा कबुल केला खरा, पण सत्य दडलेला एक पुरावा मात्र अद्यापही पोलिसांपासून दूर...  

Updated: Nov 28, 2022, 10:11 AM IST
Shraddha Walker Murder Case : पॉलिग्राफ टेस्टमध्ये आफताबकडून दिशाभूल; 5 पुराव्यांपैकी 'एक' गोष्ट मिळणं कठीण!  title=

Shraddha Walker Murder Case : श्रद्धाचे 35 तुकडे करून आफताबने तिच्या प्रेमाचा अंत केला. एवढंच नाहीतर आफताबने पोलिसांसमोर त्याचा गुन्हा कबूल देखील केला आहे. श्रद्धा हत्या प्रकरणातील आरोपी आफताब पुनावाला (Aaftab Poonawala) याला कोर्टाने 13 दिवसांची न्यायालयीन कोठडी (Judicial Custody) सुनावली असून त्याची रवानगी तिहार जेलमध्ये (Tihar Jail) करण्यात आली आहे. सोमवारी देखील आफताबची पॉलिग्राफ टेस्ट होणार आहे, यादरम्यान त्याला राहिलेले प्रश्न विचारण्यात येणार आहेत. याआधी देखील झालेल्या पॉलिग्राफ टेस्टमध्ये आफताबला प्रश्न विचारण्यात आले, पण त्याने सत्य उत्तर न देता पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. 

पॉलिग्राफ टेस्टनंतर सोमवारी होणाऱ्या नार्को टेस्टकडे पोलिसांचं लक्ष आहे. मिळालेल्या माहितीनुसार आंबेडकर रुग्णालयातील डॉक्टर नवीन आफताबची नार्को टेस्ट करणार आहेत. नार्को टेस्ट निगडीत आफताबची वैद्यकिय चाचणी देखील आंबेडकर रुग्णालयात करण्यात आली आहे. 

शनिवारी झालेल्या चाचणीचे रिपोर्ट सोमवारी नार्को टेस्ट करणाऱ्या डॉक्टरांना मिळणार आहे. याच रिपोर्टवरुन ठरेल की आफताबची नार्को टेस्ट कधी होईल. त्यामुळे आता आफताबची नार्को टेस्ट कधी होणार आणि या टेस्टमधून कोणतं सत्य कळाणार याकडे पोलिसांचं लक्ष आहे. (shraddha walker parents)

FSSL सहायक संचालक आणि पीआरओ संजीव गुप्ता यांनी सांगितलं की, आफताबची सोमवारी फॉरेन्सिक सायन्स प्रयोगशाळेत पॉलिग्राफ टेस्ट केली जाईल. पॉलीग्राफ टेस्टमध्ये अनेक टप्पे असतात. त्यातील राहिलेले टप्पे पूर्ण करण्यात येणार आहेत. शेवटचं सेशन जेव्हा झालं तेव्हा आफताबच्या आरोग्यासंबंधीचा प्रश्न निर्माण झाला होता. आता नार्को चाचणीची तयारी पूर्ण झाली असल्याचं देखील त्यांनी सांगितलं आहे. 

ते पुढे म्हणाले, आफताब चाचणीदरम्यान सहकार्य करत आहे की नाही, हे आम्ही तपास यंत्रणेलाच सांगू, कारण ही गोपनीय बाब आहे.... महत्त्वाचं म्हणजे गुन्ह्याच्या मुळापर्यंत पोहोचण्यासाठी पोलिसांना आणखी पुरावे शोधण्याची गरज आहे. पोलिसांच्या तपासात असे पाच पुरावे आहेत जे अत्यंत महत्त्वाचे आहेत. पण त्या पाच पुराव्यांमधील एक गोष्ट पोलिसांच्या हाती लागणं फार कठीण आहे. (shraddha walker letter)

पाच पुराव्यांमधील एक पुरावा म्हणजे श्रद्धाचा मोबाईल. कारण, मुंबईतील भाईंदर खाडीत आफताबने श्रद्धाचा मोबाईल फेकल्याचा आरोप करत शोध थांबवण्यात आला आहे. मोबाईल एकाच ठिकाणी असणं अशक्य असल्याचा सल्ला समुद्रशास्त्रज्ञांनी पोलिसांना दिला आहे. (shraddha walker instagram)

पोलीस 'या' पाच पुराव्यांच्या शोधात

1. श्रद्धाचं शिर 
2. शरीराचे सर्व तुकडे आणि डीएनए रिपोर्ट
3. करवत... ज्याने शरीराचे तुकडे करण्यात आले
4. श्रद्धाचे कपडे, जे तिने हत्या झाली तेव्हा घातले होते
5. श्रद्धाचा मोबाईल 

मिळालेल्या माहितीनुसार, आफताब चौकशीत प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देत नाही. काही प्रश्न विचारल्यानंतर तो शांत बसत आहे. शिवाय काही प्रश्नांना तो टाळत देखील आहे. आता राहिलेल्या प्रश्नांसाठी पोलिस सोमवारी पॉलीग्राफ चाचणी घेणार आहेत. दुसरीकडे, आफताबची नार्को चाचणी ५ डिसेंबरला होऊ शकते... असं सांगण्यात येत आहे.  (shraddha walker news)

जेलमध्ये आफताब टेन्शन फ्री
श्रद्धा हत्या प्रकरणात आफताबची कसून चौकशी सुरु आहे. पण आफताब पोलिसांना उटल सुलट उत्तर देत असल्याचं दिसून आलं आहे. आता त्याची रवानगी तिहार जेलमध्ये करण्यात आली आहे. (shraddha walker latest news) पण जेलमध्येही त्याच्या चेहऱ्यावर पश्चातापाचे किंवा तणावाचे कोणतेच भाव दिसून आले नाहीत. उलट रात्री आफताब ब्लँकेट घेऊन आरामात झोपला.