Shrdhha Wallker case : तुरुंगातही आफताब खेळतोय क्रूर 'चाल'; पाहून पोलीसही सुन्न

श्रद्धा हत्या प्रकरणी आफताब सध्या तुरुंगात आहे.  पण तुरुंगात आफताबची वागणूक पाहून पोलीसही हैराण; तुरुंगात असा जगतोय श्रद्धाचा आरोपी... मोठ सत्य समोर   

Updated: Dec 2, 2022, 12:35 PM IST
Shrdhha Wallker case : तुरुंगातही आफताब खेळतोय क्रूर 'चाल'; पाहून पोलीसही सुन्न  title=

Shraddha Walker Case : श्रद्धा वालकर (shraddha walker) हत्या प्रकरणात आफताब पुनावालाने (Aaftab Poonawala) स्वतःचा गुन्हा कबूल केला असला तरी हत्येचं रहस्य कायम आहे. श्रद्धा (shraddha walker details) हत्या प्रकरणी आफताब सध्या तुरुंगात आहे. पण तुरुंगात देखील आफताब त्याची क्रूर चाल खळत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तुरुंगातील आफताबची वागणूक पाहून पोलीस देखील सुन्न झाले आहेत. तुरुंगात गेल्यानंतर आफताबच्या आयुष्याशी संबंधित आणखी एक रहस्य उघड झालं. (Shrdhha Wallker case)

आफताबचं रहस्य पाहून तुरुंग अधिकारीही चक्रावून गेले आहेत. दिल्लीतील एक अधिकारी म्हणाले की, 'तुरुंग अधिकारी आफताब आहे की आम्ही हेच आम्हाला कळत नाही. त्याच्या इशाऱ्यांवर चौकशी सुरु आहे. तो त्यांच्या खोट्या गोष्टींमध्ये पोलिसांना अडकवण्याचा प्रयत्न करत आहे..' (shraddha walker age)

पोलिसांना आफताबच्या कोणत्याच गोष्टीच विश्वास नाही. म्हणून प्राथमिक तपासादरम्यान पोलिसांनी मानसशास्त्रज्ञांची मदत घेतली आणि आता पॉलिग्राफ आणि नार्को टेस्टकडे पोलिसांचं लक्ष आहे. (shraddha walker on instagram)

महत्त्वाचं म्हणजे कोठडीमध्ये आफताबसोबत अन्य दोन कैद्यांना ठेवण्यात आलं असून दोघांना 24 तास त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी सांगण्यात येत आहे. आफताबच्या सेल बाहेर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तुरुंगात आफताब कोणाशीच बोलत नसून एकटा राहत असल्याची माहिती समोर येत आहे. (aftab instagram)

तुरुंग अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आफताब तुरुंगात जेवतो आणि झोपतो. आफताबला केलेल्या कृत्याची जरा देखील खंत नाही. श्रद्धाची हत्या देखील त्याने क्रूर चाल खेळून केली असल्याचं सांगण्यात येत आहे. 

श्रद्धाची हत्या केल्यानंतर काय म्हणाला आफताब

श्रद्धाची हत्या (shraddha walker story) करून तिच्या मृतदेहाचे तुकडे केल्याचा मला कोणताही पश्चाताप नाही...  'आफताह म्हणाला श्रद्धाच्या हत्या प्रकरणात फाशी झाली तरी हरकत नाही. स्वर्गात गेल्यानंतर मला आणखी अप्सरा भेटतील.'  असं देखील आफताब चौकशी दरम्यान म्हणाला. 

आफताच्या या गुन्ह्यानंतर संपूर्ण देशात वातावरण तापलं आहे. आफताबला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी करण्यात येत आहे. महत्त्वाचं म्हणजे आफताबला त्याने केलेल्या गुन्ह्याची कोणतीही खंत नाही. तुरुंगात (Tihar Jail) देखील तो टेन्शन फ्री आयुष्य जगत आहे. (shraddha walkar news latest)

दरम्यान, अद्यापही श्रद्धा हत्या प्रकरणात आफताबची कसून चौकशी सुरु आहे. पण आफताब पोलिसांना उटल सुलट उत्तरं देत असल्याचं दिसून आलं आहे. आता त्याची रवानगी तिहार जेलमध्ये करण्यात आली आहे. (shraddha walker latest news) पण जेलमध्येही त्याच्या चेहऱ्यावर पश्चातापाचे किंवा तणावाचे कोणतेच भाव दिसून आले नाहीत.