Trending News - उत्तरेकडील राज्यामध्ये श्रावण महिना सुरु झाला आहे. तर राज्यात 15 दिवसांनी म्हणजे 29 जुलैपासून श्रावण सुरु होणार आहे. या महिन्याला धार्मिक महत्त्व असून महादेवीची पूजा करण्याला विशेष महत्त्व आहे. श्रावणात शिवभक्त मोठ्या मनोभावे महादेवाची पूजा करतात. भाविक महादेवाला प्रसन्न करण्यासाठी दूध, बेलपान अपर्ण करुन पूजा करतात. भक्तांच्या आराधनेला महादेव प्रसन्न झालं असून त्यांनी भक्तांना दर्शन देण्याचा ठरवलं आहे.
अहो, ते झालं असं की, उत्तर प्रदेशातील मऊ जिल्ह्यातील सरयू नदीच्या पुलाखालील रेतीत एक विशाल चांदीचे शिवलिंग मिळालं आहे. या घटनेची बातमी वाऱ्यासारखी सगळीकडे पसरली आणि शिवभक्तांनी श्रावणात महादेव थेट पृथ्वीवर आले असे बोलू लागले. पोलिसांनी शिवलिंग पोलीस स्टेशनमध्ये आणले. तिथेही शिवभक्तांनी भोलेनाथाच्या पूजा-अर्चनेसाठी एकच गर्दी केली.
या शिवलिंगाबाबत पोलिसांनी तपास यंत्रणेला माहिती दिली आहे. तपास यंत्रणेचा तपास पूर्ण झाल्यानंतर हे शिवलिंग शिवभक्तांना परत देण्यात येईल अशी माहिती पोलिसांनी दिली. सोशल मीडियावर ही बातमी येताच यूजर्सकडून कमेंट्सचा पाऊस पडतो आहे. सोशल मीडियावर हा फोटो पाहून अनेक यूजर्स ''हर हर महादेव'' असं लिहित आहेत. तर दुसरा यूजर म्हणतो, ''श्रावण महिन्यांत महादेवांनी आपल्या भक्तांना दर्शन दिलं आहे.''
UP | Some people saw a glowing object in the Ghaghra river. On taking out the object, it was found that it is a Shivling, it has been kept in the Malkhana of the police station respectfully. It will be investigated by special agencies: Avinash Pandey, SP Mau (16.07) pic.twitter.com/vd734g7QSc
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) July 16, 2022