मुंबई : बाजारात जाताना आता बॅग घेऊनच बाहेर पडा, कारण आता प्रत्येक ठिकाणी प्लास्टिक पिशवी तुम्ही मागायला गेलात तर मिळणार नाही. कारण प्लास्टिकच्या वापरावर बंदी आणण्यात आली आहे. तुम्ही जर प्लास्टिक पिशवी वापरताना दिसलात तर तुम्हालाही मोठा दंड भरावा लागू शकतो.
सिंगल यूज प्लास्टिकवर बंदी घालण्यासाठी हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. पातळ सिंगल यूज प्लास्टिक पिशव्या वापरण्यावर 1 जुलैपासून बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे या पिशव्या विकणारे आणि घेणारे दोघांवरही दंडात्मक कठोर कारवाई होऊ शकते.
प्लास्टिक स्टिक इयर बर्ड, कँडी स्टिक्स, प्लास्टिकच्या फुग्याच्या काड्या, प्लास्टिकचे झेंडे, आइस्क्रीमच्या काड्या, पॉलिस्टीरिन (थर्मोकॉल) असलेल्या इअर बड्स, थर्माकोल, प्लास्टिकच्या कप-प्लेट, प्लास्टिक पॅकिंगच्या वस्तू.
याशिवाय प्लास्टिकपासून बनवलेल्या निमंत्रण पत्रिका, सिगारेट पॅक, प्लास्टिक आणि प्लॅस्टिक वेडिंग केक, प्लास्टिक किंवा PVC बॅनर आणि 100 मायक्रॉन पेक्षा कमी स्टिरर अशी लिस्ट जारी करण्यात आली आहे.
नाशिकच्या देवळालीत प्लास्टिक पिशव्या वापरण्यांविरोधात कारवाईचा बडगा उगरण्यात येणार आहे. सर्रासपणे वापरण्यात येणा-या प्लास्टिकच्या पिशव्यामुळे 1 जुलैपासून अशा पिशव्या वापरणा-यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे.
पहिल्यांदा प्लास्टिक पकडलं तर 500 मग 1000 त्यानंतर 2 हजार असा दंड वाढत जाणार आहे. हा दंड ग्राहकांसाठी असेल तर विक्रेते, व्यापारी आणि इंस्टिट्यूशनल स्तरावर हा दंड 5 हजार ते 20 हजार रुपयांपर्यंत आकारला जाऊ शकतो.