मतदानासाठी EVM मशिनचं बटन दाबलं आणि थोड्याच वेळात मृत्यू झाला; महाराष्ट्रातील धक्कादायक घटना

मतदानादरम्यान साताऱ्यात धक्कादायक घटना घडली आहे. मतदानाचा हक्क बजावल्यानंतर थोड्यावेळातच मतदात्याचा मृत्यू झाला. 

वनिता कांबळे | Updated: Nov 20, 2024, 08:58 PM IST
मतदानासाठी EVM मशिनचं बटन दाबलं आणि थोड्याच वेळात मृत्यू झाला; महाराष्ट्रातील धक्कादायक घटना title=

Maharashtra Assembly Election 2024 :   महाराष्ट्रात विधानसभा निवडणूकसाठी मतदान पार पडले. मतदानादरम्यान सातारा जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. मतदान करताना हृदयविकाराचा झटका आला. यानंतर मतदानकर्त्याचा जागीच मृत्यू झाला. मतदानाचा हक्क बजावल्यानंतर या मतदात्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.  

नेमकं काय घडलं?

साताऱ्यातील खंडाळा तालुक्यात मोरवे येथे मतदान कर्त्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. श्याम धायगुडे (वय वर्ष 67) असे या मतदान कर्त्याचे नाव आहे. आपला मतदानाचा हक्क बजावल्यानंतर बाहेर पडताना त्यांना अचानक छातीत दुखण्याचा त्रास जाणवू लागला. त्यानंतर त्यांना खाजगी वाहनाने लोणंद च्या खाजगी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, त्यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितले आहे. 

या मृत व्यक्तीच शव विच्छेदन करण्यात आल असून या व्यक्तीचा मृतदेह नातेवाईकांना देण्यात आला आहे. आपला मतदानाचा हक्क बजावल्यानंतर हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याने सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, परभणी जिल्ह्यातही जिंतूरच्या निवळी बुद्रुक येथील मतदान केंद्राच्या पायवर ह्दयविकाराचा झटका आल्याने  मतदाराचा मृत्यू झालाय. मतदान केंद्रावर ह्दयविकाराचा आल्याने त्यांना बोरी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी तपासणई केल्यानंतर मृत्यू झाल्याची सांगितलं. लिंबाजी खिस्ते असं मयत व्यक्तीचं नाव आहे..

हिंगोलीच्या बाळापूर मतदान केंद्रावर एका तरूणाला अति उत्साह अंगाशी आलाय. मतदान करतानाचा व्हिडीओ तयार करून व्हायरल केल्याप्रकरणी संतोष आमले या तरूणाविरोधात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. बाळापूर पोलिसांनी या तरूणाला ताब्यात घेतलंय.