Mutual Fund SIP Calculator: एकीकडे जगभरातील शेअर बाजारात पडझड पाहायला मिळतेय. मात्र अशातही म्युच्युअल फंडाबाबत सामान्य गुंतवणूकदारांमध्ये मात्र भरवसा अजूनही कायम आहे. मे 2022 मध्ये म्हणजेच लागोपाठ 9व्या महिन्यातही तब्बल 10 हजार कोटींपेक्षा अधिकची गुंतवणूक आली आहे. इक्विटी बाजारातील गुंतवणूकदारांच्या वाढत्या संख्येमुळे सलग 15 व्या महिन्यात इक्विटी फंडांमध्ये इनफ्लो अजूनही कायम आहे. गेल्या काळात इक्विटी म्युच्युअल फंड्समध्ये 18,529 कोटींची गुंतवणूक आली आहे. (sip calculator savings of only 100 ruppes per day see how a fund of 30 lakhs can be made)
Systematic Investment Planning (SIP) ची खासियत म्हणजे यामध्ये तुम्ही अगदी शंभर रुपयांपासून गुंतवणूक करू शकतात. तुम्हाला एकच वेळी मोठी रक्कम गुंतवण्याची गरज नाही. महत्त्वाची बाब म्हणजे यामध्येही इक्विटीसारखाच परतावा मिळतो. SIP मध्ये लॉंगटर्मसाठी केलेल्या गुंतवणुकीत कम्पाउंडिंगचा मोठा फायदाही होतो. तुम्ही तुमच्या छोट्या मोठ्या बचती SIP माध्यमातून गुंतवत राहिलात, तर काही वर्षांमध्ये तुमच्याकडे लाखो रुपयांचा फंड गोळा होऊ शकतो.
गृहीत धरा तुम्ही रोज 100 रुपयांची सेव्हिंग करतात. म्हणजेच महिन्याकाठी तुमची 3000 रुपयांची बचत करताय. जर तुम्ही दर महिना तीन हजारांची बचत करताय आणि तुम्हाला 12 टक्के रिटर्न्स मिळत असतील तर साधारण 20 वर्षांमध्ये तुमच्याकडे साधारण 30 लाख रुपयांचा फंड आरामात जमू शकतो. या संपूर्ण कालावधीत तुमचं स्वतःचे केवळ 7.2 लाख रुपये गुंतवले जातील आणि तुम्हाला मिळणारा अनुमानित फायदा हा साधारणतः 22.8 लाखांचा असेल.
लॉन्गटर्म गुंतवणुकीसाठी तुम्हाला बऱ्याचशा स्कीम्स मिळतील. ज्यामध्ये तुम्हाला वार्षिक 12 टक्के किंवा अधिकचा परतावा मिळू शकतो. यामध्ये वार्षिक परतावा किती टक्के मिळतो यावर तुमच्या गुंवणूकीवर होणारे परिणाम अवलंबून असतील हे ध्यानात ठेवावं लागेल. तुम्हाला मिळणारा परतावा हा बाजारातील चढ उतारांवर अवलंबून आहे.
डिस्केमर - म्युच्युअल फंडातील गुंतवणूक जोखमीची असते, तुमची गुंतवणूक ही आपल्या आर्थिक सल्लागाराशी चर्चा करून करावी.