मुंबई : देशातील पहिल्या महिला शिक्षिका फातिमा शेख ( Fatima Sheikh Birthday) यांची आज (9 जानेवारी 2022) 191 वी जंयती आहे. या जंयतीनिमित्ताने गूगलने डूडलद्वारे (Fatima Sheikh Birthday Google Doodle) सन्मानित केलं आहे. (social reformer fatima sheikh 191 birth anniversary salute google doodle to first muslim teacher)
फातिमा शेख यांनी समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्यासह 1848 मध्ये स्वदेशी वाचनालयाची सुरुवात केली होती. हेच वाचनालय देशातील मुलींसाठीची पहिली शाळा असल्याचं म्हंटलं जातं. फातिमा शेख यांचा जन्म आजच्याच दिवशी म्हणजे 9 जानेवारी 1831 रोजी पुण्यात झाला होता. त्या पुण्यात त्यांचा भाऊ उस्मानसोबत राहायच्या.
महात्मा फुले आणि त्यांच्या पत्नी सावित्रिबाई फुले यांचं स्त्री शिक्षणातील योगदान हे संपूर्ण जगाला माहिती आहे. मुली शिकल्या पाहिजेत, या भावनेनी या दोन्ही समाजसुधारकांनी स्री शिक्षणाचा पाया रचला. यासाठी दोघांनी अंगावर दगड, धोंडे, शेण चिखलाचा मारा सहन केला. त्यांना समाजाकडूनच नाही, तर घरातूनही विरोध करण्यात आला.
दीन दुबळ्या आणि गरिबांना शिक्षण देण्याच्या विरोधात फुले दाम्पत्यांना त्यांच्या वडिलांनी घरातून बाहेर काढलं होतं. त्यावेळेस उस्मान शेख आणि फातिमा शेख यांनी दोघांना आश्रय दिला.
स्वदेशी पुस्तकालयाची स्थापना फातिमा शेख यांच्या घरात करण्यात आली होती. याच ठिकाणी फातिमा शेख आणि फुले दाम्पत्यांनी गरीब, दीन दुबळ्या, वंचित आणि मुस्लिम महिलांच्या स्त्री शिक्षणाच्या मोहिमेला सुरुवात केली.
दारोदारी जाऊन स्त्री शिक्षणाचा प्रसार
फातिम शेख या दारोदारी जाऊन मुलींना आपल्या घरी अभ्यासासाठी बोलवायच्या. शिक्षणापासून दूर असलेल्या वंचित मुलांनी जातिव्यवस्थेची बंधनं झुगारुन वाचनालयात येऊन अभ्यासा करावा, अशी फातिमा शेख यांची इच्छा होती.
फातिम शेख यांनी स्वत:ला फुले दाम्पत्याप्रमाणे स्त्री शिक्षणाच्या कार्यात झोकून दिलं होतं. या स्त्री शिक्षणाच्या कार्यात त्यांना विरोधाचा सामना करावा लागला. अनेकांनी त्यांच्या कार्यात अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मात्र फातिमा शेख यांनी आपलं काम अविरत सुरु ठेवलं.
गूगल डूडल म्हणजे काय?
गूगल देशातील महत्त्वाच्या दिवशी उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा डूडलद्वारे सन्मान करतं. या विशेष दिवशी गूगलच्या लोगोमध्ये एनिमेटेड बदल करुन डूडल तयार केल जातं, यालाच डूडल असं म्हणतात. गूगल अनेक विषयांवर जनजागृती करण्यासाठीही डूडल तयार करत असतं.
It takes a woman and her unflinching will to bring about reform in the face of resistance.
Our #GoogleDoodle, celebrating the 191st birthday of #FatimaSheikh, honours her efforts to educate the underprivileged community Know more: https://t.co/GhSDhFMO6X. pic.twitter.com/Xyg1UBSgP9
— Google India (@GoogleIndia) January 9, 2022