मुलाने वडिलांविरोधात केला FIR दाखल, 'पपा करायचे लॉकडाऊनचे वारंवार उल्लंघन'

दिल्लीच्या वसंत कुंज भागात एका मुलाने लॉकडाऊन उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली आपल्या वडिलांविरुध्द तक्रार दाखल केली आहे. .

Updated: Apr 3, 2020, 02:18 PM IST
मुलाने वडिलांविरोधात केला FIR दाखल, 'पपा करायचे लॉकडाऊनचे वारंवार उल्लंघन' title=
संग्रहित छाया

नवी दिल्ली : दिल्लीच्या वसंत कुंज भागात एका मुलाने लॉकडाऊन उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली आपल्या वडिलांविरुध्द तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मुलाने आरोप केला आहे की, त्याचे वडील लॉकडाऊनचे पालन करीत नव्हते. ते आणि वारंवार घराबाहेर जात होते, त्यांना सागूनही ते ऐकत नव्हते.

मुलाचे नाव अभिषेक आहे. तर लॉकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्या  वडिलांचे नाव वीरेंद्र सिंह आहे. अभिषेक एका ऑटोमोबाईल कंपनीत काम करतो. लॉकडाऊनचे उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली दिल्ली पोलिसांनी बुधवारी ४०५३ लोकांना वेगवेगळ्या ठिकाणाहून ताब्यात घेतले आहे,  नंतर कायदेशीर कारवाई केल्यानंतर त्यांना इशारा देऊन सोडून देण्यात आले.

दिल्ली पोलिसांचे प्रवक्ते एसीपी अनिल मित्तल यांनी बुधवारी सायंकाळी सांगितले की, "बुधवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत पोलिसांनी आयपीसीच्या कलम १८८ अन्वये दिल्लीत  २४९  गुन्हे दाखल केले गेले आहेत.

बुधवारी दिल्ली पोलिसांनी दिल्ली पोलिस कायद्याच्या कलम ६६ नुसार ५१५ वाहने जप्त केली आहेत. तर  १ एप्रिल रोजी म्हणजेच  बुधवारी वेगवेगळ्या जिल्ह्यात कारवाई करण्यात आली आहे.