सोनाक्षी- झहीरचे लग्न होताच 'या' राज्यात विरोधाची लाट; पोस्टर लावत दिला थेट इशारा

Sonakshi Sinha Zaheer Iqbal Wedding: सोनाक्षी सिन्हा हिचे लग्न गेल्या काही दिवसांपासून चर्चेत होते. अखेर काल त्यांचे लग्न पार पडले आहे.   

मानसी क्षीरसागर | Updated: Jun 24, 2024, 02:23 PM IST
सोनाक्षी- झहीरचे लग्न होताच 'या' राज्यात विरोधाची लाट; पोस्टर लावत दिला थेट इशारा title=
Sonakshi Sinha Zaheer Iqbal Wedding Protest Poster in bihar by Hindu Shiv Bhavani Sena

Sonakshi Sinha Zaheer Iqbal Wedding: बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि अभिनेता झहीर इक्बाल यांचा 23 जून रोजी मुंबईत लग्नसोहळा पार पडला. सोनाक्षी आणि झहीर यांचे लग्न गेल्या कित्येत दिवसांपासून चर्चेत होते. बॉलिवूड अभिनेते आणि बिहारी बाबू म्हणून प्रसिद्ध असलेले शत्रुघ्न सिन्हा हे देखील सोनाक्षीच्या लग्नावरुन नाराज असल्याचे बोलले जात होते. मात्र, सोनाक्षीच्या लग्नाच्या वेळी ते तिच्याच बाजूला उभे राहत होते. सोनाक्षीदेखील वडिलांचा हात हातात घेऊन उभी होती. मात्र, सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांच्या लग्नाला बिहारमध्ये विरोध होत असल्याचे पाहायला मिळतेय. बिहारमध्ये सोनाक्षी आणि इक्बाल यांच्याविरोधात एक पोस्टर लावण्यात आले आहे. हे पोस्टर हिंदू शिव भवानी सेनेकडून लावण्यात आले आहेत. या पोस्टरमध्ये सोनाक्षी सिन्हाला बिहारमध्ये पाय ठेवू देणार नाही, असा इशारा देण्यात आला आहे. 

हिंदू शिव भवानी सेनेने पोस्टर लावले आहेत. त्यात म्हटलं आहे की, सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांचे लग्न लव्ह जिहादला प्रोत्साहन देणारे आहे. संपूर्ण देशात इस्लामीकरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. शत्रुघ्न सिन्हा यांनी या लग्नावर पुन्हा विचार करावा. नाहीतर त्यांची मुलं लव आणि कुश आणि त्यांच्या घराचे नाव रामायण लगेचच बदलावे. यामुळं हिंदू धर्माचा अपमान होत आहे. 

हिंदु शिव भवानीकडून हे पोस्टर लावण्यात आले असले तरी लव कुमार सिंह उर्फ रुद्र यांने हे पोस्टर लावले आहेत. ते हिंदू शिव भवानीचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. पोस्टरवर पुढे लिहलेले आहे की, सोनाक्षी सिन्हाला हिंदू शिव भवानी सेना बिहारमध्ये पाय ठेवून देणार नाही. 

पोस्टरवर काय लिहलंय?

पोस्टरवर लिहण्यात आलेले आहे की, हिंदू धर्माला कमकुवत आणि नुकसान पोहोचवण्याच्या उद्देशाने सोनाक्षी सिन्हाचे लग्न प्रेमाच्या नावाने एक कट असून अवैध धर्मांतरण आहे. यामुळं लव जिहादला प्रोत्साहन मिळेल. संपूर्ण देशात इस्लामीकरण करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असं यात लिहण्यात आलं आहे. 

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांनी 23 जून रोजी रजिस्टर पद्धतीने लग्न केले आहे. लग्नानंतर त्यांनी शिल्पा शेट्टीच्या रेस्टोरंटमध्ये रिसेप्शन पार्टी ठेवली होती. कुटुंबासोबत काही खास मित्रांनादेखील आंमत्रण होते. अनेक मोठे सेलेब्रिटी या लग्नाला उपस्थित होते. सोनाक्षी आणि झहीर यांच्या रिसेप्शन वेडिंगला सलमान खान, रेखा, तब्बू, काजोलपासून अनेक बॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावली होती. मात्र आता या लग्नाला विरोध करणारे पोस्टर पटनामध्ये लावण्यात आले आहे.