स्वस्त सोने खरेदीची संधी, 'या' दिवशी सरकारकडून Sovereign Gold Bond खरेदी करा

तुम्ही सोने (Gold ) खरेदी करण्याच्या विचार असाल तर चार दिवस थांबा. तुमच्यासाठी सरकारकडून स्वस्तात सोने खरेदी करण्याची संधी उपलब्ध करुन देण्यात येत आहे.  

Updated: May 13, 2021, 11:47 AM IST
स्वस्त सोने खरेदीची संधी, 'या' दिवशी सरकारकडून Sovereign Gold Bond खरेदी करा
संग्रहित फोटो

 मुंबई : तुम्ही सोने (Gold ) खरेदी करण्याच्या विचार असाल तर चार दिवस थांबा. तुमच्यासाठी सरकारकडून स्वस्तात सोने खरेदी करण्याची संधी उपलब्ध करुन देण्यात येत आहे.  यावर्षीतील  सॉवरेन गोल्ड बॉन्ड (Sovereign Gold Bond) योजना 17 मेपासून खरेदीसाठी खुली करण्यात येत आहे. केंद्रीय अर्थ मंत्रालयाने बुधवारी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, 2021-22 (FY22)या आर्थिक वर्षासाठी सॉवरेन गोल्ड बॉन्ड मे 2021 ते सप्टेंबर 2021 पर्यंत सहा वेळा खरेदी करण्याची संधी देण्यात येत आहे.

Sovereign Gold Bond ही योजना 2021-22 ची प्रथम विक्री 17 मेपासून म्हणजे सोमवारपासून पाच दिवसांसाठी खुली असेल. पीटीआयच्या वृत्तानुसार, अर्थ मंत्रालयाने म्हटले आहे की, मे आणि सप्टेंबर दरम्यान ही स्वस्त सोने खरेदी करता येणार आहे. हे सोने खरेदी करताना केवायसी निकष बाजारपेठेतून सोने खरेदी करण्यासारखेच असतील. सरकारची सावरेन गोल्ड बाँड योजना नोव्हेंबर 2015मध्ये सुरू करण्यात आली होती.

आथिर्क वर्ष 2021-22 ची हिली सोने खरेदी  17 ते 21 मे दरम्यान खरेदी करता येईल आणि 25 मे रोजी बॉन्ड दिले जातील. मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार हे बॉन्ड स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, नियुक्त पोस्ट ऑफिस आणि मान्यताप्राप्त स्टॉक एक्सचेंज, नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज लिमिटेड मार्फत विकले जातील. भारत सरकारच्यावतीने हे सॉवरेन गोल्ड बॉन्ड रिझर्व्ह बँकेद्वारे जारी केले जातील. छोट्या फायनान्स बँका आणि पेमेंट बँकांना बॉण्ड विक्री करण्याची परवानगी नाही.

Tranche Date of Subscription Date of Issuance
2021-22- Series I May 17-21, 2021 May 25, 2021
2021-22 Series II May 24 – 28, 2021 June 01, 2021
2021-22 Series III May 31 – June 04, 2021 June 08, 2021
2021-22 Series IV July 12-16, 2021 July 20, 2021
2021-22 Series V August 09-13, 2021 August 17, 2021
2021-22 Series VI August 30- September 03, 2021 August 30- September 03, 2021

अर्थ मंत्रालयाने म्हटले आहे की, सोन्याच्या बॉन्डची किंमत इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन लिमिटेडने जारी केलेल्या किंमतीच्या सामान्य सरासरी किंमतीवर असेल. गुंतवणूकीच्या कालावधीआधी आठवड्याच्या शेवटच्या तीन व्यावसायिक दिवसांमध्ये ही किंमत 999 शुद्ध सोन्याची सरासरी किंमत असेल. बॉण्ड खरेदी करण्यासाठी ऑनलाईन किंवा डिजिटल पैसे भरणाऱ्यांना बॉन्डच्या किंमतीत प्रति ग्रॅम 50 रुपये सूट मिळेल.  

अर्थ मंत्र्यालयाच्या निवेदनात म्हटले आहे की, कोणतीही व्यक्ती आणि हिंदू अविभाजित कुटुंब जास्तीत जास्त चार किलोग्रॅम किंमतीचे रोखे खरेदी करु शकेल, तर विश्वस्त आणि तत्सम संस्थांची जास्तीत जास्त खरेदी मर्यादा 20 किलोग्राम आहे.