दिवसाला फक्त 7 रुपयांची बचत करून मिळवा 5000 दरमहा उत्पन्न; जाणून घ्या सरकारची फायदेशीर योजना

अटल पेंशन योजना ही केंद्र सरकारकडून चालवण्यात येणारी एक यशस्वी योजना आहे.

Updated: May 13, 2021, 11:12 AM IST
दिवसाला फक्त 7 रुपयांची बचत करून मिळवा 5000 दरमहा उत्पन्न; जाणून घ्या सरकारची फायदेशीर योजना
representative image

Atal pension Yojana | अटल पेंशन योजना ही केंद्र सरकारकडून चालवण्यात येणारी एक यशस्वी योजना आहे. या योजनेचं संचालन PFRDA ही रेग्युलेटरी बॉडी करते. ही योजना विशेषतः असंघटीत क्षेत्रातील कर्माचऱ्यांसाठी आहे. या योजनेतील सर्व सुविधा आणि फायद्यांची जबाबदारी भारत सरकार घेते.

18 ते 40 वर्षादरम्यान सर्व नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतात. या योजनेत कमीत कमी 20 वर्षापर्यंत गुंतवणूक करणे गरजेचे आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे बॅकेचे खाते असणे गरजेचे आहे.  खासगी क्षेत्रातील बँकासुद्धा अटल पेंशन योजनेचे खाते उघडत आहेत.

दरमहा 5000 रुपये पेन्शन मिळवा

संघटीत क्षेत्रातील लोकांचे उत्पन्नाचा विचार करता, 60 वर्षानंतर त्यांचा खर्च कसा भागेल. या दृष्टीने ही योजना समोर आली आहे. जे असंघटीत कामगार आयकरच्या बाहेर आहेत, तेच लोक या योजनेचा लाभ घेऊ शकतात. 1000 रुपयांपासून ते 5000 रुपयांपर्यंत पेंशन मिळू शकते. 

वयानुसार या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी वेगवेगळे रक्कम आकारली जाते. जेवढ्या लवकर तुम्ही या योजनेत पैसे गुंतवाल तेवढे तुम्हाला कमी रक्कम दरमहा भरावी लागेल.

5000 रुपयांच्या दरमहा पेन्शनसाठी तुम्हाला दरमहा 210 रुपये योजनेसाठी जमा करावे लागतील. म्हणजेच 7 रुपये प्रतिदिवस होय. जर तुम्ही 39 वर्षाचे आहात तर तुम्हाला 1318 रुपये प्रतिमाह योजनेत जमा करावे लागतील.

अटल पेंशन योजना सुरू असलेल्या व्यक्तीचे निधन झाल्यास कुटूंबाला योजनेचा फायदा सुरू राहिल. व्यक्तीच्या पत्नीचा मृत्यू झाल्यानंतरही मुलांना या पेंन्शनचा लाभ घेता येईल.