नवी दिल्ली: घर असो किंवा ऑफिस कोळ्याची जाळी कोपऱ्या कोपऱ्या दिसत असतं. आपल्याला ते पाहून खूप किळस वाटते त्यामुळे आपण ते साफसफाई करतो. पण कोळी जाळं कसं विणतो ते कधी पाहिलंय का? कोळं जाळं खूप विचारपूर्वक विणत असतो. त्याचं हे कसबं आणि कौशल्य काही सेकंदाच कॅमेऱ्यात कैद झालं आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल केवळ सुंदर सुंदर आणि सुंदरच.
एक छोटासा कोळी एवढं मोठं जाळं विणतो. ज्यामध्ये अनेक किडे अडकतात. कोणत्याही ट्रेनिंग शिवाय हा कोळी अत्यंत सुंदर पद्धतीनं जाळं विणतो हे या व्हिडीओमध्ये दिसत आहे. कोळ्याचा जाळं विणतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही हैराण व्हाल
Buitengebieden नावाच्या एका युझरने हा व्हिडीओ ट्वीट केला आहे. कोळी जाळं विणताना असं कॅप्शन देऊन हा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला. त्यानंतर काही तासांत तुफान व्हायरल झाला.
Spider weaving a web.. pic.twitter.com/lIIG02DOc2
— Buitengebieden (@buitengebieden_) August 30, 2021
Not only beautiful but so important. Those webs keep other annoying and destructive bugs out of your home. Never destroy a spider’s web.
— Steve (@Libretto66) August 30, 2021
The Darwin's Bark Spider can build a 2 metre orb web with a silk that ranks as the world's toughest natural fibre and can shoot web at 25 meters of distancepic.twitter.com/tXhfLh4Kaf
— venus (@venus47203379) August 30, 2021
1 मिनिट 56 सेकंदाच्या या व्हिडीओनं सर्वांचं मन जिंकून घेतलं आहे. कोळ्याचं अद्भूत स्कील पाहून लोक हैराण होत आहे. कोळी आरामात जाळं विणायला सुरुवात करतो. मात्र तो आपला स्पीड वाढवतो आणि पुढच्या काही मिनिटांत त्याचं जाळं विणून होतं. हा व्हिडीओ पाहून अनेकांना धक्काही बसला आहे की कोळ्याने एवढ्या पटपट जाळं कसं विणलं. अनेक युझर्सनी यावर कमेंट्सही केल्या आहेत.