WhatsApp वर मेसेज न वाचताही ब्ल्यू टिक, तरुणीला आला संशय, बाथरुमच्या बल्ब होल्डरमध्ये दडलं होतं रहस्य

दिल्लीत युपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थिनीच्या रुम आणि बाथरुममध्ये स्पाय कॅमेरे लावण्यात आले होते. तिला व्हॉट्सअपवरील काही गोष्टींमुळे संशय आला आणि तिने तपास केला. यावेळी एक कॅमेरा सापडला असता तिने पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी घरमालकाच्या मुलाला बेड्या ठोकल्या आहेत.   

शिवराज यादव | Updated: Sep 25, 2024, 01:52 PM IST
WhatsApp वर मेसेज न वाचताही ब्ल्यू टिक, तरुणीला आला संशय, बाथरुमधील बल्ब होल्डरमध्ये दडलं होतं रहस्य title=

दिल्ली पोलिसांनी एका तरुणीला अटक केली आहे, ज्याने भाडेकरु तरुणीच्या रुम आणि बाथरुमच्या बल्ब होल्डरमध्ये स्पाय कॅमेरा लावला होता. स्पाय कॅमेऱ्याच्या माध्यमातून तो तरुणीच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवत होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी युपीएससीची तयारी करत आहे आणि भाड्याच्या घऱात एकटीच राहत होती. जेव्हा कधी ती सुट्टीवर जात असे तेव्हा घराची चावी मालकाच्या मुलाकडे सोपवत असे. 

घरमालकाचा मुलगा आरोपी करणने याच गोष्टीचा फायदा घेत तीन महिन्यांपूर्वी पीडितेच्या फ्लॅटमधील दोन बल्ब होल्डरमध्ये स्पाय कॅमेरे लावले होते. व्हॉट्सअपवर काही अनपेक्षित हालचाली पाहिल्यानंतर तरुणीला शंका आली. यावेळी तिला आपलं व्हॉट्सअप अकाऊंट एका अनोळखी लॅपटॉपवर लॉग इन असल्याचं लक्षात आलं. यानंतर तिने घऱात शोध सुरु केला असता बल्ब होल्डरमध्ये स्पाय कॅमेरा मिळाला. 

डीसीपी अपूर्वा यांनी सांगितलं की, तरुणीला व्हॉट्सअपवर काही संशयास्पद हालचाली होत असल्याचं लक्षात असल्याने तिने तज्ज्ञांशी संपर्क साधला. त्यांनी तिचं व्हॉट्सअप अकाऊंट तपासलं असता ते एका लॅपटॉपवर लॉग इन असल्याचं सांगितलं. पोलीस तपासात समोर आलं की, तरुणीचा करणवर फार विश्वास होता. यामुळेच करण फ्लॅटमध्ये ये-जा करत असे. अशाच एका क्षणी त्याने संधी साधत तिचं व्हॉट्सअप अकाऊंट आपल्या लॅपटॉलवर लिंक केलं असावं अशी शंका आहे. यानंतर तो तिचे सर्व मेसेज वाचत होता. 

आरोपीकडून एक स्पाय कॅमेरा आणि 2 लॅपटॉप जप्त

दिल्ली पोलिसांनी करणची चौकशी आणि तपास केला असता त्याच्याकडे एक स्पाय कॅमेरा आणि दोन लॅपटॉप सापडले. याच लॅपटॉपमध्ये तो रेकॉर्ड केलेले व्हिडीओ स्टोअर करत होता. करणने तरुणीच्या घऱात जो स्पाय कॅमेरा लावला होता, तो रिमोटशी किंवा ऑनलाइन जोडलेला नव्हता. यामुळे कऱण काहीतरी कारण शोधून फ्लॅटची चावी मिळवण्याचा प्रयत्न कर असे. जेणेकरुन त्या चीपमधील डेटा तो ट्रान्सफर करु शकेल. 

आरोपीही करत होता UPSC ची तयारी

दिल्ली पोलिसांना करणविरोधात सबळ पुरावे मिळाले आहेत. यानंतर त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी करण अपंग असून गेल्या सात वर्षांपासून युपीएससीची तयारी करत होता. पण त्याला यश मिळत नव्हतं. 

दरम्यान दिल्ली पोलिसांनी या प्रकरणानंतर भाड्याने एकटं राहताना काळजी घेण्याचं आणि अनोळखी लोकांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन केलं आहे.