Ssc Chsl Recruitment 2022 | 12 वी पास तरुणांसाठी सरकारी नोकरीची संधी, इतक्या जांगासाठी मेगाभरती

नोकरीच्या शोधात असलेल्या इच्छूकांसाठी आनंदाची बातमी आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशनने (Staff Selection Commission) सीएचएसएल परीक्षांची (SSC CHSL 2022 Tier 1 Exam) घोषणा केली आहे.   

Updated: Feb 21, 2022, 01:36 PM IST
Ssc Chsl Recruitment 2022 | 12 वी पास तरुणांसाठी सरकारी नोकरीची संधी, इतक्या जांगासाठी मेगाभरती title=
प्रातिनिधिक छायाचित्र

मुंबई : नोकरीच्या शोधात असलेल्या इच्छूकांसाठी आनंदाची बातमी आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशनने (Staff Selection Commission) सीएचएसएल परीक्षांची (SSC CHSL 2022 Tier 1 Exam) घोषणा केली आहे.  एसएससीने  ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. कर्मचारी निवड आयोगाकडून जवळपास 5 हजार पदांसाठी पदभरतीसाठी परीक्षेचं आयोजन केलं आहे. या विविध पदांसाठी इच्छूक अर्ज करु शकतात. अर्ज करण्याची अखेरची तारीख ही 7 मार्च आहे.  (ssc chsl recruitment 2022 chsl tier 1 exam know how to apply and know all details)

कोणत्या पदासाठी भरती? (SSC CHSL 2022)

लोअर डिव्हीडन क्लर्क (LDC)/ कनिष्ठ सचिवालय सहाय्यक 
पोस्ट असिस्टेटं/सॉर्टिंग असिस्टेंट
डाटा एन्ट्री ऑपरेटर (DEO) 

असा करा अर्ज 

इच्छूक उमेदवार या विविध पदासांठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करु शकतात. यासाठी एसएसचीच्या ssc.nic.in अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन फॉर्म भरता येईल. तसंच उमंग एपद्वारे (Umang App)अर्ज करता येणार आहे.

SSC CHSL Recruitment 2022 साठी असा करा अर्ज 

  •   एसएसचीच्या ssc.nic.in अधिकृत वेबसाईटवर जा. 
  •  होम पेजवर सीएचएसएल पदभरतसाठी 'अर्ज करा' या पर्यायावर क्लिक करा.
  •  नवीन पेज समोर ओपन होईल. तिथे आवश्यक माहिती भरा. त्यानंतर तुमची नोंदणी होईल. 
  •  यानंतर आयडी आणि पासवर्ड टाकून लॉगीन करा.  
  •  तिथे विचारण्यात आलेली सर्व माहिती भरा. आवश्यक ते सर्व कागदपत्र अपलोड करा.  
  •  त्यानंतर अर्ज शुल्क भरा आणि सबमिटवर क्लिक करा. 
  •  यानंतर तुम्ही हॉलतिकीट डाऊनलोड करु शकता. 

SSC CHSL 2022 पात्रता निकष

सीएचएसएल पदभरतीसाठी अर्ज करणारा इच्छूक उमेदवार हा मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थेतून 12 वी पास हवा. तसेच अर्जदाराचं वय हे 27 पेक्षा जास्त असू नये.  

SSC CHSL Recruitment 2022 परीक्षेसंदर्भात महत्त्वाच्या तारखा

  1. अर्ज करण्याची तारीख - 1 फेब्रुवारी ते 7 मार्च 2022  
  2. ऑनलाईन परीक्षा शुल्क भरण्याची अखेरची तारीख : 8 मार्च
  3. ऑफलाईन बॅंकेतून परीक्षा शुल्क भरण्याची अखेरची तारीख 10 मार्च
  4. आवेदन अर्जात दुरुस्त करण्याची तारीख 11 ते 15 मार्च 
  5. टियर -1 कॉम्प्यूटर आधारित परीक्षेची तारीख : मे 2022
  6. टियर- 2 डिस्क्रिप्टिव परीक्षेची तारीख अजून जाहीर करण्यात आलेली नाही.