बंगालमध्ये स्टार वॉर, २४ सेलिब्रिटींचा तृणमुल आणि भाजपमध्ये प्रवेश

पश्चिम बंगालमध्ये (West Bengal Election) प्रचाराची रणधुमाळी 

Updated: Mar 5, 2021, 07:12 PM IST
बंगालमध्ये स्टार वॉर, २४ सेलिब्रिटींचा तृणमुल आणि भाजपमध्ये प्रवेश title=

रामराजे शिंदे, नवी दिल्ली : पश्चिम बंगालमध्ये (West Bengal Election) प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. परंतु बंगालमध्ये यंदा प्रचारात सेलिब्रिटी मोठ्या प्रमाणावर उतरल्याचं दिसतं आहे. बंगाल निवडणुकीत (Bengal Election 2021) एक एक जागा जिंकण्यासाठी दोन्ही पक्षश्रेष्ठींनी खास रणनीती तयारी केली आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजप आणि टीएमसी दोघांनीही तब्बल दोन डझन सेलिब्रिटींना मैदानात उतरवलं आहे. म्हणूनच यंदाची बंगाल निवडणुकीचं द्वंद्व केवळ नेत्यांमध्येच नव्हे तर सेलिब्रिटींमध्ये सुद्धा असणार आहे.

तृणमूल काँग्रेसचा (Trinamul congress) विचार केला तर अनेक स्टार्संना त्यांनी पक्षात स्थान दिलं आहे.

क्रिकेटर मनोज तिवारी
अभिनेत्री सयानी घोष
कांचन मलिक
राज चक्रवर्ती
दीपांकर दे
कौशानी मुखर्जी
लवली मित्रा
संगीत कलाकार रशीद खास यांची मुलगी व अभिनेत्री सायनी खान यांना पक्षात महत्त्वाच्या जबाबदा-या देण्यात आल्या आहेत.

वास्तविक राजकारणात सेलिब्रिटींचा ट्रेंड ममता बॅनर्जी (Mamta Banerjee) यांनी सुरू केला. 2001 मध्ये बंगाली स्टार तापस पाॅल यांना पक्षात घेतलं. त्यांना आमदार, खासदार बनवलं. 2014 ला मुनमुन सेन आणि दीपक अधिकारी या कलाकारांना लोकसभेत पाठवले. तर 2019 मध्ये नुसरत जहां आणि मिमी चक्रवर्ती या दोन्ही बंगाली अभिनेत्रींनी टीएमसीच्या तिकीटावर विजयी झाल्या.

तर त्याच पावलावर पाऊल टाकत भाजपनंही गायक बाबुल सुप्रियो (Babul Supriyo) यांना खासदार केलं. आता पुन्हा भाजपनंही टीएमसी (TMC) चा किल्ला भेदण्यासाठी सेलिब्रिटींनी फौज मैदानात उतरवली आहे.

क्रिकेटर अशोक डिंडा
अभिनेत्री पायल सरकार
हिरण चॅटर्जी
यश दासगुप्ता  
पापिया अधिकारी
सौमिली घोष बिस्वास 
राज मुखर्जी
मल्लिका बॅनर्जी
अशोक भद्र 
मिनाक्षी घोष
अंजना बासु 
रूद्रनील घोष
परनो मित्रा
ऋषी कौशिक
कंचना मोइत्रा
रूपंजना मित्रा
भाजपमध्ये (BJP) सामिल झाले आहेत.

तृणमूल काँग्रेसकडे 8 स्टार्स आहेत तर भाजपनं 16 स्टार्सना सोबत घेऊन निवडणूक लढवते आहे. म्हणजे तब्बल 24 सेलिब्रिटी बंगाल निवडणूकीत महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. सेलिब्रिटींच्या आधारे बंगालमध्ये वोट बँक काबिज करता येईल हे निकालातून दिसून येईल.

दक्षिणेतील राजकारणात अभिनेत्यांचा दबदबा चांगलाच राहिला आहे. पण आता परिवर्तन आणि विद्वत्तेची भूमि असलेल्या पश्चिम बंगालमध्ये नेत्यांना अभिनेत्यांची गरज जाणवते आहे. विकासाऐवजी स्टार्सच्या भरवशावर निवडूक लढवली जातेय. या स्टार वॉर मध्ये कॉमन मॅननं कोणत्याही मोहाला बळी न पडता आपली ताकद दाखवून दिली तरच लोकशाही जिवंत राहील.