नवी दिल्ली : पीएम नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या कार्यक्रमात गुरुवारी बोलताना अनेक गोष्टींवर भर दिला. अनलॉक 1 मध्ये पीएम मोदींचं हे पहिलं संबोधन होतं. पीएम मोदींनी म्हटलं की, 'संकल्प शक्तीनेच पुढचा मार्ग ठरवला जावू शकतो. आज देशापुढे अनेक आव्हानं आहेत. समस्येचं औषध मजबूत राहणं आहे. कठीण वेळ ही संधी घेऊन येते.'
पीएम मोदींनी म्हटलं की, "कोरोनाच्या विरोधात भारताची लढाई मोठी आहे. प्रत्येक नागरिकाचा संकल्प आहे. समस्येला संधीमध्ये रुपांतर करण्याची. ही आत्मनिर्भर बनण्याची संधी आहे. कोरोना संकट देशासाठी मोठं वळण असणार आहे. आत्मनिर्भर भारत अभियानाला पुढे घेऊन जायचं आहे. भारताला आपल्या पायावर उभं राहायचं आहे. पराभव स्वीकारणाऱ्यांना संधी नाही मिळत.''
पीएम मोदींनी म्हटलं की, "लोकलसाठी वोकल व्हावं लागेल. देशाच्या विकासात युवा वर्ग पुढे आहे. स्वदेशी वस्तूंचा वापर वाढवावा लागेल. आमचा प्रयत्न शेतकऱ्यांना सशक्त करण्याचा आहे. आत्मनिर्भरतेची सुरुवात आपल्या कुटुंबापासून करा. छोट्या दुकानदारांकडून वस्तू खरेदी करा. भारत मोठा निर्यात करणारा देश कसा बनेल यासाठी आपण विचार केला पाहिजे. शेतकऱ्यांना कोठेही त्यांचा माल विकण्याची परवानगी सरकारने त्यांना दिली आहे. आपल्या सगळ्यांना एकत्र पुढे जायचं आहे.''
'ज्या वस्तू आपल्याला बाहेरुन मागवाव्या लागतात. त्यावस्तू आपण आपल्या देशात कसे बनवू शकतो आणि ती निर्यात कशी करु शकतो यासाठी विचार केला पाहिजे. हीच योग्य वेळ आहे, लोकलसाठी वोकल होण्याची. आत्मनिर्भर भारत अभियान अंतर्गत मोठा बदल करण्याची घोषणा केली गेली आहे. आता त्याला प्रत्यक्षात आणायचं आहे.'
पंतप्रधान मोदींनी म्हटलं की, 'कोणतीही कंपनी आपल्या वस्तूंचं प्रपोजल पीएमओपर्यंत पोहोचवू शकतं. लोकांना GEM सोबत जुडायचं आहे. कारण देशात बनलेल्या वस्तू खरेदी करता येतील.'