नोटबंदीच्या १५ महिन्यानंतरही नोटांची गणना सुरूच

नोटाबंदीला १५ महिने उलटले तरी ५०० आणि एक हजारच्या नेमक्या किती नोटा बँकेत परत आल्या आहेत

Updated: Feb 12, 2018, 11:18 PM IST
नोटबंदीच्या १५ महिन्यानंतरही नोटांची गणना सुरूच  title=

मुंबई : नोटाबंदीला १५ महिने उलटले तरी ५०० आणि एक हजारच्या नेमक्या किती नोटा बँकेत परत आल्या आहेत, याची गणना अजूनही सुरूच असल्याचं रिझर्व्ह बँकेनं म्हटलंय. माहितीच्या अधिकाराखाली मिळालेल्या माहितीत गणना वेगानं करण्यासाठी रिझर्व्ह बँकेनं ५९ अत्याधुनिक यंत्र आयात केली आहेत.

सध्या या यंत्रांच्या माध्यमातून प्रत्येक बँकेनं रिझर्व्ह बँकेत जमा केलेल्या नोटांचा हिशोब सुरू आहे. सध्या हे काम कुठे सुरू आहे, आणि होण्यास आणखी किती अवधी लागेल याचा तपशील मात्र देण्यात आलेला नाही. एप्रिल २०१७ मध्ये रिझर्व्ह बँकेनं जारी केलेल्या वार्षिक अहवालात परत आलेल्या नोटांची किंमत १५.२८ लाख कोटी रुपये असल्याचं सांगण्यात आलं.

८ नोव्हेंबर २०१६ च्या मध्यरात्री नोटाबंदी झाली. त्यावेळी चलनात असलेल्या पाचशे आणि हजाराच्या नोटांची किंमत १५.४४ लाख रुपये होती. त्यामुळे जवळ जवळ ९९ टक्के नोटा बँकांमध्ये परत आल्या असून  फक्त १६ हजार ५० कोटी रुपयांच्या नोटा बँकेत परत आलेल्या नसल्याचं पुढे आलं होतं. 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x