मुंबई : स्टॉक मार्केटमध्ये पुन्हा एकदा आयपीओच्या माध्यमातून गुंतवणूकीची संधी आहे. नायका, फिनो पेमेंट्स बँकेनंतर आता मार्केटप्लेस पॉलिसीबाजार आणि पैसाबाजारची पॅरंट कंपनी PB Fintech चा इ्श्युसुद्धा बाजारात ऍन्ट्री घेण्यास तयार आहे. 1 ते 3 नोव्हेंबरपर्यंत इश्यू सब्सक्राइब करता येणार आहे. कंपनीच्या इश्युची प्राइस बँड 940 -980 रुपये निश्चित करण्यात आली आहे. Policybazaar चा आयपीओ 15 नोव्हेंबर रोजी शेअर बाजारात लिस्ट होणार आहे.
5709.72 कोटी रुपये उभारण्याचे नियोजन
पॉलिसीबाजार आयपीओच्या माध्यमातून 5709.72 कोटी रुपये उभारण्याची तयारी आहे. आय़पीओच्या माध्यमातून 3750 कोटी रुपयांची फ्रेश इक्विटी जारी करण्यात येणार आहे. तसेच 1959 कोटी रुपयांचे शेअर ऑफर फॉर सेल (OFS)च्या माध्यमातून विकले जाणार आहे. ऑफर फॉर सेलमध्ये SVF Python II (cayman)1875 कोटी रुपयांचे शेअर विकण्यात येतील.
कोण किती शेअर विकणार?
कंपनीमध्ये मोठ्या गुंतवणूकदारांची भागीदारी आहे. आशिष दहिया 30 कोटी रुपयांचे शेअर विकतील. अलोक बंसल 12.75 कोटी आणि शिखा दहिया 12.50 कोटी रुपयांचे OFS जारी करतील. कंपनीचे फाऊंडर युनायटेड ट्रस्ट आपल्या 2.68 लाख शेअर्सचे OFS मध्ये जारी करण्यात येतील.
कोणाची किती भागीदारी
DRHP ने दिलेल्या माहितीनु्सार, SVF PythonII (cayman)कडे कंपनीची 4.27 टक्के स्टेक आहे. अलोक बंसल यांच्याकडे 1.45 टक्के भागीदारी आहे. पॉलिसीबाजार मध्ये अनेक मोठ्या गुंतवणूकदारांचा पैसा लागला आहे. यामध्ये सॉफ्टबँक, टेमासेक, इंफोएज, टायगर ग्लोबल आणि प्रेमजी इनवेस्ट यांची गुंतवणूक आहे.
लीड मॅनेजर
पॉलिसीबाजार आयपीओसाठी बुक रनिंग लीड मॅनेजरमध्ये कोटक महिंद्रा कॅपिटल, मॉर्गन स्टॅनली, सिटिग्रुप ग्लोबल मार्केट इंडिया, ICICI सेक्युरिटीज, HDFC बॅंक, IIFL सेक्युरिटीज आणि जेफरीज इंडियाची निवड करण्यता आली आहे. पॉलिसीबाजारवर दरवर्षी 10 कोटी विजिटर्स येतात तसेच कंपनी दरमहिन्याला 4 लाख पॉलिसी विकत असते.