Trending News In Marathi: इयत्ता दहावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याचा क्रिकेट खेळताना मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेशच्या अमरोहा येथे ही घटना घडली आहे. खेळतानाच विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याने त्याच्या कुटुंबीयांना एकच धक्का बसला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, विद्यार्थ्याने क्रिकेट खेळत असताना थंड पाणी प्यायला आणि त्यानंतर त्याला चक्कर आली व तो मैदानातच खाली कोसळला. विद्यार्थ्याला अस्वस्थ वाटू लागल्याने त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तोपर्यंत उशीर झाला होता. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
युवकाच्या मृत्यूने कुटुंबीयांवर दुखःचा डोंगर कोसळला आहे. कुटुंबीयांनी कोणतीही कायदेशीर कारवाई न करता त्याच्यावर अत्यंसंस्कार केले आहेत. उत्तर प्रदेशातील हसनपुर नगरमधील मोहल्ला कायस्थान येथील हे प्रकरण आहे. प्रिन्स सैनी असं या युवकाचे नाव असून तो शनिवारी मित्रांसोबत सोहरका मार्गावर असलेल्या मैदानात मित्रांसोबत क्रिकेट खेळायला गेला होता. क्रिकेट खेळत असतानाच प्रिन्स बॉटलमध्ये असलेलं थंड पाणी प्यायला. त्यानंतर त्याला चक्कर आली आणि तो मैदानातच कोसळला.
प्रिन्स चक्कर येऊन खाली कोसळला तेव्हा त्याचे मित्र घाबरले. त्यांनी लगेचच त्याच्या कुटुंबीयांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर लगेचच ई-रिक्षामध्ये बसवून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तिथे गेल्यावर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. प्रिन्सच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. त्यांनी कोणतीही कायदेशीर कारवाई न करता गंगा घाटावर अंतिम संस्कार केले.
प्रिन्सचा मृत्यू थंडीमुळं झाला असावा असा तर्क काहींनी लावला आहे. तर, काही म्हणत आहेत की हृदयरोगाच्या झटक्याने प्रिन्सचा मृत्यू झाला आहे. त्याच्या कुटुंबीयांनी सांगितले की, प्रिन्स नगरच्या एका इंटर महाविद्यालयात दहावीच्या वर्गात शिकत होता. प्रिन्सला एक भाऊ आणि एक बहिण आहे. प्रिन्सच्या मृत्यूमुळं त्याच्या आई-वडिलांना मोठा धक्का बसला आहे तर त्याच्या भावा-बहिणींचेही रडून रडून हाल झाले आहेत.