Students Drink Flavoured Condom Water: पश्चिम बंगालमधील दुर्गापूरमध्ये एक विचित्र प्रकार उघडकीस आला आहे. येथील तरुणाईला फ्लेव्हर्ड कंडोमचं व्यसन लागलं आहे. त्यामुळेच या भागात फ्लेव्हर्ड कंडोमच्या मागणीत भरमसाठ वाढ झाली आहे. व्यसनाच्या आधीन गेलेले हे तरुण मोठ्या प्रमाणात फ्लेव्हर्ड कंडोम विकत घेतात आणि त्यापासून दारुप्रमाणे नशा चढणारं पेय तयार करुन त्याचं सेवन करतात.
फ्लेव्हर्ड कंडोम विकत घेतल्यानंतर या कंडोमची पाकीटं फोडून ते कंडोम गरम पाण्यात भिजत ठेवतात. त्यामुळे या कंडोमवर फ्लेव्हरसाठी लावण्यात आलेलं रसायन पाण्यात मिसळतं. नंतर तासाभराने हा कंडोम त्या पाण्यातून काढून ते पाणी हे तरुण नशा करण्यासाठी पितात. हे पाणी प्यायल्याने 10 ते 12 तास शरीरामध्ये ऊर्जा राहते आणि फ्रेश वाटते असं या तरुणाचं म्हणणं आहे.
तरुणाईला लागलेल्या या विचित्र व्यसनामुळे दुर्गापूरमध्ये फ्लेव्हर्ड कंडोमचा खप वाढला आहे. अचानक या भागात फ्लेव्हर्ड कंडोमचा असा खप वाढल्याने त्याचा असला विचित्र पद्धतीने वापर केला जात असल्याची माहिती समोर आल्याचं वृत्त 'न्यूज 18 हिंदी' वृत्तवाहिनीने दिली आहे. दुर्गापूरमध्ये हॉस्टलमधील अनेक विद्यार्थी हे असलं विचित्र व्यसन करतात. येथील विद्यार्थी मद्य, सिगारेट आणि इतर व्यसनांच्या आहारी गेले आहेत. मात्र ही व्यसनं करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैसा लागतो. त्या तुलनेत कंडोम स्वस्त असल्याने अनेक तरुण आता हे व्यसन करु लागले आहेत.
कंडोम हे कोणत्याही मेडिकलमध्ये सहज उपलब्ध असतात. तसेच ते घेऊन फिरणे सहज शक्य होतं. कंडोमसाठी डॉक्टरांच्या प्रिस्क्रीप्शनची गरज लागत नाही. तसेच कंडोम विकत घेण्यासाठी तांत्रिक दृष्ट्या कायद्याने कोणतेही बंधन नाही. या आणि अशा काही वेगळ्याच कारणांमुळे तरुणाईला फ्लेव्हर्ड कंडोमचं पाणी पिण्याचं विचित्र व्यसन लागलं आहे. दुर्गापूरमधील अनेक भागांमध्ये मागील काही आठवड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात हे फ्लेव्हर्ड कंडोम विकले जात आहेत.
नक्की वाचा >> 'या' एका सीनमुळे भारतात S E X टॉइजच्या विक्रीमध्ये डारेक्ट 55% वाढ!
अचानक फ्लेव्हर्ड कंडोमची मागणी वाढल्याने दुकानदारही संभ्रमात पडले. त्यांनी या विद्यार्थ्यांकडे चौकशी केली असता यामागील नशेसंदर्भातील कनेक्शन समोर आलं. पूर्वी दिवसाला केवळ 3 ते 4 कंडोमची पाकिटं विकली जायची. आता या परिसरामध्ये कंडोम विक्रीसाठी उपलब्ध नाहीत एवढ्या मोठ्या प्रमाणात मागणी वाढल्याचं दुकानदारांनी सांगितलं.
दुकानदारांनी या फ्लेव्हर्ड कंडोममध्ये काही अशी रसायनं असतात की ज्यांच्या सेवनामुळे कॅन्सरचा धोका निर्माण होऊ शकतो. नशेसाठी अशा स्वस्त गोष्टींच्या माध्यमातून जीव धोक्यात घालू नये असं दुकानदारांचं म्हणणं आहे. या असल्या विचित्र गोष्टींपासून क्षणिक आनंद मिळू शकतो मात्र भविष्याच्या दृष्टीने ही गोष्ट घातक ठरु शकते.