दोन बॉयफ्रेंडसोबत महिला डॉक्टर हॉटेल रुममध्ये नको त्या अवस्थेत असतानाच नवरा आला अन्...

विवाहित डॉक्टर महिला दोन प्रियकरांसह हॉटेलमध्ये आक्षेपार्ह परिस्थितीत रंगेहाथ पकडल्या गेली आहे. त्यानंतरचा हायव्होल्टेज ड्रामाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. 

Updated: May 11, 2024, 10:05 AM IST
दोन बॉयफ्रेंडसोबत महिला डॉक्टर हॉटेल रुममध्ये नको त्या अवस्थेत असतानाच नवरा आला अन्... title=
Extramarital affair video viral

एका धक्कादायक घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. गेल्या काही वर्षांमध्ये विवाहबाह्य संबंधांच्या घटनेत वाढ झाल्याच दिसून येतं आहे. शिवाय अशा घटनांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. अशीच एक धक्कादायक आणि हायव्होल्टेज ड्रामाच्या घटना समोर आली आहे. डॉक्टर महिला तिच्या दोन बायफ्रेंडसह आक्षेपार्ह अवस्थेत असताना तिच्या नवऱ्याने रंगहाथ पकडले. त्यानंतर जे काही घडलं ते कॅमेऱ्यात कैद झालं. 
पत्नीला अशा अवस्थे पाहून नवऱ्याने आणि कुटुंबातील काही सदस्यांनी त्या महिलेला आणि दोन व्यक्तींना बेदम मारहाण केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनीही घटनास्थळ गाठले आणि महिलासह तिच्या दोन प्रियकरांना ताब्यात घेतलं. 

उत्तर प्रदेशातील कासगंज जिल्ह्यातून एक धक्कादायक घटनेने शहरात एकच खळबळ माजली आहे. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार सदर महिला आणि तिच्या नवऱ्याचं 2013 मध्ये लग्न झालं होतं. पण गेल्या दोन वर्षांपासून पती पत्नीमध्ये वाद सुरु होते. हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे. दोघेही वेगळे राहत होते तर डॉक्टर पत्नी कासगंज जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयात कार्यरथ होती. पत्नीच्या वागण्यावर पतीला अनेक दिवसांपासून संशय होता. म्हणून तो पत्नीवर पाळत ठेवून होता. 

बुधवारी एका हॉटेलमध्ये पत्नी दोन तरुणांसोबत रुममध्ये असताना पतीने काही नातेवाईकांसोबत रुमवर धाड घातली. त्यावेळी पत्नी त्या दोन पुरुषांसोबत आक्षेपार्ह अवस्थेत सापडली. त्यानंतर त्या तिघांना पती आणि नातेवाईकांनी बेदम मारहाण केली. दरम्यान डॉक्टर महिला एक वर्षांपूर्वीच सासर सोडून दुसरीकडे राहिला गेली होती. 

दरम्यान पोलिसांनी दोन्ही तरुणांना ताब्यात घेऊन चौकशी केली आणि शांतता भंग केल्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आलीय.