Subrata Roy : कोण आहे सुब्रत रॉय सहारा यांची पत्नी? भारतात नाही तर 'या' देशात राहतो संपूर्ण परिवार

Subrat Roy Family : सहारा इंडिया समुहाचे प्रमुख सुब्रत रॉय यांचे मुंबईत निधन झाले. सुब्रत रॉय यांच्या निधनानंतर अचानक त्यांच्या कुटुंबियांची देखील जोरदार चर्चा रंगली आहे. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Nov 15, 2023, 12:52 PM IST
Subrata Roy : कोण आहे सुब्रत रॉय सहारा यांची पत्नी? भारतात नाही तर 'या' देशात राहतो संपूर्ण परिवार  title=

Subrat Roy Family Citizenship of Macedonia :  देश-विदेशात सहारा श्री नावाने लोकप्रिय असलेले सहारा इंडिया परिवाराचे संस्थापक आणि प्रमुख सुब्रत रॉय यांचे मंगळवारी निधन झाले. सुब्रत रॉय हे एका गंभीर आजाराने पीडित होते त्यांनी खासगी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. या दुःखद माहितीनंतर सगळ्यांनीच हळहळ व्यक्त केली. सहारा श्री यांच्या निधनानंतर अचानक त्यांच्या कुटुंबियांची चर्चा व्हायला लागली. आता त्यांचे संपूर्ण कुटूंब कुठे आहे. त्यांची पत्नी आणि मुलं यांच्याकडे परदेशी नागरिकत्व आहे. भारतातील कायद्यापासून वाचण्यासाठी त्यांनी हे केलं असल्याचं सांगण्यात येतं. 

मॅसेडोनियाचे नागरिकत्व 

सुब्रत रॉय सहारा यांच्या पत्नी स्वप्ना रॉय आणि मुलगा सुशांतो रॉय यांनी दक्षिण-पूर्व युरोपच्या मध्यभागी बाल्कन द्वीपकल्पात असलेल्या मॅसेडोनिया देशाचे नागरिकत्व घेतले आहे. कुटुंबातील सदस्य खाजगी गुंतवणूक कंपन्यांचा भाग आहेत, परंतु आता ते भारतीय नागरिक नाहीत. मॅसेडोनिया देश गुंतवणुकीच्या बदल्यात नागरिकत्व प्रदान करते.

(हे पण वाचा - सहारा समूह प्रमुख सुब्रतो रॉय यांचं वयाच्या 75 व्या वर्षी निधन)

सुब्रतो रॉय यांचे मॅसेडोनियाशी चांगले संबंध 

सुब्रतो रॉय यांचे या देशाशी चांगले संबंध आहेत. ते स्वत: मॅसेडोनियामध्ये अनेक वेळा राजकिय अतिथी म्हणून होते. त्यांनी मॅसेडोनियामध्ये मदर तेरेसा यांचा भव्य पुतळा उभारण्याचा प्रस्ताव ठेवला होता आणि तेथे एक आलिशान कॅसिनो उभारण्याचीही चर्चा होती. मॅसेडोनियन नागरिकत्व इतर देशांच्या तुलनेत खूपच स्वस्त आहे.

गुंतवणुकीच्या मोबदल्यात नागरिकत्व 

मॅसेडोनियन सरकार किमान 4 दशलक्ष युरो गुंतवणाऱ्या आणि किमान 10 स्थानिक लोकांना रोजगार देणाऱ्या कोणालाही नागरिकत्व देऊ शकते. त्याच वेळी, जे या देशात 40 हजार युरोपेक्षा जास्त किमतीची रिअल इस्टेट खरेदी करतात त्यांना मॅसेडोनियामध्ये एका वर्षासाठी राहण्याचा अधिकार दिला जातो.

मॅसेडोनिया 1991 मध्ये वेगळा देश बनला

मॅसेडोनिया पूर्वी युगोस्लाव्हियाचा एक भाग होता, ज्यापासून ते 1991 मध्ये वेगळे झाले होते. त्याच वेळी, 1993 मध्ये, संयुक्त राष्ट्रांनी (UN) त्याला स्वतंत्र देश म्हणून मान्यता दिली होती.

(हे पण वाचा - Subrata Roy Sahara ते Sonali Bendre यांना होता Rare Cancer, जाणून घ्या का जीवघेणा आहे आजार)

सहारा इंडियाचे संपूर्ण प्रकरण 

सहारा इंडियाची सुरुवात प्राइम सिटीच्या आयपीओने झाली. ही फसवणूक लक्षात आल्यानंतर सेबीने सहारा इंडियाचे सेबी खाते फ्रीज केले आणि गुन्हा दाखल केला. या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर सुब्रत रॉय यांना दोन वर्षे तिहार तुरुंगात राहावे लागले. 2016 मध्ये तो पॅरोलवर तुरुंगातून बाहेर आला होता.