आता ४० सुखोई ब्राहमोससज्ज

हवाई दलात सुखोई विमानांचं स्थान खूप महत्वाचं आहे. 

Updated: Dec 18, 2017, 06:17 PM IST
आता ४० सुखोई ब्राहमोससज्ज title=

नवी दिल्ली : हवाई दलात सुखोई विमानांचं स्थान खूप महत्वाचं आहे. 

सुखोईचं महत्व 

भारताच्या हवाई दलातली सुखोई-३० विमानांमध्ये अत्यंत आधुनिक आणि भेदक मारा करण्याची क्षमता आहे. ही विमानं ध्वनीच्या वेगापेक्षा अधिक वेग गाठतात. आपल्या हवाई दलातील ही सर्वात सक्षम विमानं आहेत. या विमानावर आता ब्राहमोससारखी शक्तीशाली क्षेपणास्त्र बसवली जाणार आहे. 

ब्राहमोसचा दरारा

ब्राहमोस ही क्षेपणास्त्र भारत आणि रशिया यांनी संयुक्तपणे हे क्षेपणास्त्र विकसित केलं आहे. याचं वजन २.५ टन असून वेग ध्वनीच्या वेगाच्या तिप्पट आहे. जवळपास ४०० किमी पर्यत मारक टप्पा आहे. 

चीन आणि पाकिस्तानशी दोन हात

२०२० सालापर्यत ४० "सुखोई-३०" विमानांचा एक ताफा ब्राहमोस क्षेपणास्त्रांनी सज्ज करण्यात येणार आहे. यामुळे भारताची क्षमता कित्येक पटींनी वाढणार आहे. भविष्यात चीन आणि पाकिस्तानशी एकाच वेळी लढण्याची वेळ येऊ शकते. ही शक्यता लक्षात घेऊन हवाई दल तयारी करतं आहे.