'सनी लिओनचा कार्यक्रम झाला तर आत्महत्या करू'

सनी लिओनच्या एका कार्यक्रमाला कर्नाटकात मोठा विरोध झाला... त्यानंतर हा कार्यक्रम रद्द करण्यात आला. 

Updated: Dec 16, 2017, 02:06 PM IST
'सनी लिओनचा कार्यक्रम झाला तर आत्महत्या करू' title=

बंगळुरू : सनी लिओनच्या एका कार्यक्रमाला कर्नाटकात मोठा विरोध झाला... त्यानंतर हा कार्यक्रम रद्द करण्यात आला. 

नव्या वर्षांच्या निमित्तानं बंगळुरूमध्ये सनी लिओनचा एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. जोरदार विरोधानंतर राज्य सरकारनं हा कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचं घोषित केलंय. 

प्रो-कन्नड संघटना कर्नाटक रक्षमा वेदिका युवा सेनेच्या (KRV) सदस्यांनी या कार्यक्रमाला विरोध केला होता. हा कार्यक्रम झाला तर सामूहिक आत्महत्या करू, अशी धमकीच कार्यकर्त्यांनी दिली होती. यापूर्वी कार्यकर्त्यांनी सनीच्या कार्यक्रमाचे पोस्टर्सही जाळले होते. 

'सनी लिओन हिची पार्श्वभूमी चांगली नाही... आणि नव्या वर्षांच्या निमित्तानं तिची उपस्थिती आमच्या सांस्कृतिक जमिनीवर एक हल्लाच आहे' असं वक्तव्य या संघटनेचे अध्यक्ष हरीश यांनी केलं होतं.

विरोधानंतर कर्नाटकचे गृहमंत्री रामालिंगा रेड्डी यांनीही, सनी लिओनी भारतीय संस्कृतीच्या विरुद्ध आहे असं म्हणत कार्यक्रम रद्द करण्याचं आणि आंदोलनाचं समर्थन केलं होतं.