खेळता खेळता बाल्कनीतून चिमुकल्याचा तोल गेला आणि...

खेळता खेळता बालक बाल्कनीतून खाली कोसळला चिमुकला, पण सुपर वुमन होऊन पाहा आईनं कसा वाचवला जीव

Updated: Jan 1, 2022, 09:29 PM IST
खेळता खेळता बाल्कनीतून चिमुकल्याचा तोल गेला आणि... title=

नवी दिल्ली : आई ही मुलासाठी कायम तत्पर असते. वेळप्रसंगी आपला जीवही ती धोक्यात घालते. अशीच एक घटना सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. वेळीच आईनं चिमुकल्याला पकडलं नाहीतर मोठा अनर्थ घडला असता.

अनेकदा डोळ्यासमोर लहान मुलं असं काही करतात जे काळजाचा धोका चुकवणारं असतं. लहान मुलांकडे डोळ्यात तेल घालून लक्ष द्यावं लागतं. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. जो काळजाचा ठोका चुकवणारा आहे. 

आई आणि लहान मुल सोबत एका ठिकाणी आहेत. तिथे गॅलरीमध्ये लहान मुलं खेळता खेळता पुढे जातं आणि जे घडलं ते पाहून काळजाचा ठोका चुकतो. लहान मुलाचा तोल जातो आणि ते खाली पडणार असतं. तेवढ्यात आईचं लक्ष त्या मुलाकडे जातं. आई सुपरमॅन सारखं सर्व शक्ती एकवटून त्या मुलाचा जीव वाचते. 

सोशल मीडियावर युझर्सनी या आईचं खूप कौतुक केलं आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये आई लिफ्टमधून मुलासोबत बाहेर येते. लहान मुलं गॅलरीच्या दिशेनं खेळत जातं. आई फोनवर बोलण्यात मग्न असते. मुलाचा तोल जातो त्याच वेळी आईची नजर त्याच्यावर पडते. त्या मुलाला आई वाचवण्यासाठी आपला जीव धोक्यात घालते. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला आईची नक्की आठवण येईल. 

आई हे मायेचं आणि संरक्षण कवच असतं जी प्रत्येक संकटातून मुलाला वाचवण्यासाठी झटत असते. सोशल मीडियावर या महिलेचं खूप कौतुक होत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Meme wala (@memewalanews)

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओची पुष्टी झी 24 तास करत नाही.