कर्जबुडव्या विजय मल्ल्याला सुप्रीम कोर्टाचे खडे बोल

बँकांची कर्ज बुडवून पळून गेलेल्या विजय मल्ल्याला सुप्रीम कोर्टाने खडे बोल सुनावले आहेत.

Updated: Jan 20, 2020, 12:04 PM IST
कर्जबुडव्या विजय मल्ल्याला सुप्रीम कोर्टाचे खडे बोल title=

बंगळुरु : बँकांची कर्ज बुडवून पळून गेलेल्या विजय मल्ल्याला सुप्रीम कोर्टाने खडे बोल सुनावले आहेत. मल्ल्याने आत्तापर्यंत एक पैसाही परत केलेला नाही असं म्हणत न्यायालयाने मल्ल्याच्या याचिकेवर सुनावणी करताना खडे बोल सुनावले. ईडीने मल्ल्याची संपत्ती जप्त केली आहे. जप्त केलेली ही संपत्ती बँकांना देण्याचा निर्णय कर्नाटक उच्च न्यायालयाने दिला होता. या निर्णयाला मल्ल्याने सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं आहे. त्यावर सुनावणी करताना सुप्रीम कोर्टाने खडे बोल सुनावले आहेत. जस्टीस नरीमन यांनी हे खडे बोल सुनावले. मात्र या याचिकेपासून जस्टीस नरीमन यांनी स्वतःला दूर ठेवलं आहे.

आज विजय मल्ल्याच्या याचिकेवर सुनावणी करताना सुप्रीम कोर्टाने मल्ल्याला चांगलंच सुनावलं. विजय मल्ल्याची ईडीकडून जप्त केलेली संपत्ती बँकांना देण्याची विनंती १२ बँकांनी केली होती. या विरोधात मल्ल्याने सुप्रीम कोर्टात याचिका केली होती.