डोंबिवलीकरांच्या ट्रेनच्या समस्या, सुप्रिया सुळेंचा लोकसभेत आवाज

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी डोंबिवलीच्या लोकल ट्रेनच्या समस्या लोकसभेमध्ये मांडल्या.

Updated: Dec 3, 2019, 03:57 PM IST
डोंबिवलीकरांच्या ट्रेनच्या समस्या, सुप्रिया सुळेंचा लोकसभेत आवाज

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी डोंबिवलीच्या लोकल ट्रेनच्या समस्या लोकसभेमध्ये मांडल्या. काहीच महिन्यांपूर्वी डोंबिवली ते सीएसएमटी ट्रेन सुरु करण्यात आली होती. पण ही ट्रेन कल्याणवरून येते, त्यामुळे ट्रेनला गर्दी होते. कल्याणवरुनच प्रवासी बसून येत असल्यामुळे डोंबिवलीकरांना ट्रेन डोंबिवलीवरून सुटणारी असली तरी बसायला मिळत नाही. हा मुद्दा सुप्रिया सुळेंनी लोकसभेत मांडला.

रेल्वे अधिकाऱ्यांकडे याबाबत तक्रार केल्यानंतरही कोणतीही कारवाई झाली नसल्याचं सुप्रिया सुळे म्हणाल्या. ट्रेनच्या बिघडलेल्या वेळापत्रकाबाबतही सुप्रिया सुळे लोकसभेत बोलल्या. तसंच डोंबिवलीवरून जास्त ट्रेन सोडण्यात याव्यात, अशी मागणी सुप्रिया सुळेंनी केली.