सुषमा स्वराज यांनी चीनला सुनावलं

डोकलाममध्ये भारत आणि चीन यांच्यामधील तणाव वाढत आहे. यामध्येच भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. सुषमा स्वराजने राज्यसभेत म्हटलं की, डोकलाममधून तोपर्यंत भारत आपलं सैन्य मागे नाही हटवणार जोपर्यंत चीन आपलं सैन्य मागे नाही हटवत. सुषमा स्वराज यांनी साफ शब्दात म्हटलं की, चीनने आधी सैन्य मागे घ्यावं मग भारत पुढचं पाऊल घेईल.

Updated: Jul 20, 2017, 03:31 PM IST
सुषमा स्वराज यांनी चीनला सुनावलं title=

नवी दिल्ली : डोकलाममध्ये भारत आणि चीन यांच्यामधील तणाव वाढत आहे. यामध्येच भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. सुषमा स्वराजने राज्यसभेत म्हटलं की, डोकलाममधून तोपर्यंत भारत आपलं सैन्य मागे नाही हटवणार जोपर्यंत चीन आपलं सैन्य मागे नाही हटवत. सुषमा स्वराज यांनी साफ शब्दात म्हटलं की, चीनने आधी सैन्य मागे घ्यावं मग भारत पुढचं पाऊल घेईल.

स्वराज यांचे महत्त्वाचे मुद्दे

- चीनसोबतच्या विवादात संपूर्ण देश आमच्या सोबत
- चीनची मागणी आहे की, भारताने आपलं सैन्य हटवावं. आम्ही म्हणतोय की, चर्चा करा आणि दोन्ही देशांनी आपलं सैन्य हटवावं. 
- ट्राई जंक्शन पॉईंटसंबंधित भारत आणि चीन यांच्यात करार झाला होता की, - भारत, चीन आणि भूटान मिळून निर्णय घ्यावे.