आता गाढव नायब तहसिलदाराच्या परीक्षेला बसणार?

तहसीलदार भरती परीक्षेसाठी चक्क गाढवाला ओळखपत्र जारी करण्यात आलं आहे.

Updated: Apr 29, 2018, 05:36 PM IST

जम्मू-काश्मीर : काश्मीरमध्ये नायब तहसीलदार भरती परीक्षेसाठी चक्क गाढवाला ओळखपत्र जारी करण्यात आलं आहे. सोशल मीडियावर हे ओळखपत्र मोठ्याप्रमाणात व्हायरल होत असून नेटक-यांकडून खिल्ली उडवली जात आहे. ‘काचूर खार’ नावानं हे प्रवेशपत्र तयार केलंय. काचूर खार म्हणजे तपकिरी रंगाचा गाढव. जम्मू-काश्मीर सर्व्हिस सिलेक्शन बोर्डाकडून घेण्यात येणारी ही परीक्षा रविवारी होणार आहे. 

याबाबत विचारणा करण्यासाठी बोर्डाला फोन करण्याचाही प्रयत्न केला, मात्र कोणतंही उत्तर मिळालं नाही. २०१५ मध्येही जम्मू काश्मीरच्या प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी गायीचा फोटो असलेलं प्रवेशपत्र छापलं होतं.