देशात 'या' रस्त्यावर घडतात रहस्यमयी घटना, कधी गाडीचा वेग बदलतो तर कधी वेळ...!

इथल्या लोकांसोबत याठिकाणी गूढ गोष्टी घडतायत. असा अनुभव या मार्गावरून जाणाऱ्या नागरिकांनी घेतला आहे. 

Updated: Jul 8, 2022, 01:29 PM IST
देशात 'या' रस्त्यावर घडतात रहस्यमयी घटना, कधी गाडीचा वेग बदलतो तर कधी वेळ...! title=

मुंबई : जगात अशा अनेक रहस्यमय गोष्टी आहेत, ज्याबद्दल जाणून घेतलं तर प्रत्येकजण आश्चर्यचकित होईल. रांची टाटा NH वर असलेली तैमार घाटी सध्या चर्चेत आहे. इथल्या लोकांसोबत याठिकाणी गूढ गोष्टी घडतायत. असा अनुभव या मार्गावरून जाणाऱ्या नागरिकांनी घेतला आहे. 

लोकांच्या म्हणण्याप्रमाणे, इथून जाताना लोकांच्या मोबाईलमध्ये वेळ बदलतो. याबाबत तज्ज्ञांनाही आश्‍चर्य वाटलं असून त्याचा तपास सुरू आहे. 

तैमारा घाटीतून जाणाऱ्या अनेकांना वेगवेगळे अनुभव आलेत. काही लोकांच्या म्हणण्याप्रमाणे, कारचा वेग मध्येच बदललेला दिसून येतो आणि स्पीडोमीटर काहीतरी वेगळंच दर्शवतो सांगतो. काही लोक म्हणतात की, अनेकदा वाहनाची क्लच प्लेट जाम होते आणि गाडी थांबते. मग काही वेळाने गाडी आपोआप सुरू होते.

मोबाईलमध्ये तारिख आणि वेळ बदललेली दिसते

रांची विद्यापीठाच्या भूगर्भशास्त्र विभागाचे लेक्चरर डॉ नितीश प्रियदर्शी यांनी याबाबत सांगितलं की, त्यांनाही अशाच एका विचित्र घटनेची माहिती मिळाली. एके दिवशी त्याच्या एका मित्राने असाच एक प्रसंग सांगितला. मित्राच्या म्हणण्यानुसार, तो रांची-टाटा रोडच्या रामपूरहून बंडू रोडने जात असताना त्याला फोन आला. त्यावेळी तो कार चालवत होता. 

ही घटना 11 जानेवारी 2022 ची आहे. त्याचा फोन अचानक बंद झाला. जेव्हा त्याने पुन्हा फोन चालू केला तेव्हा त्याला धक्काच बसला कारण फोनमध्ये 27 ऑगस्ट 2023 ही तारीख येत होती आणि वेळही बदलली होती. म्हणजेच हा कॉल दीड वर्षापूर्वीच्या काळापासून आला होता. त्याच्या विविध मित्रांसोबतही अशा अनेक घटना घडल्या.

यासोबतच ही घटना घडलेल्या ठिकाणच्या लाईट्सही चालू बंद होत असल्याचं समोर आलंय. डॉ.प्रियदर्शी यांनी सांगितलं, तर या लोकांच्या गाडीचा वेगही जास्त नव्हता. त्यांचं म्हणणं आहे की, असे काही चुंबकीय किरणोत्सर्ग आहे, ज्याचा मोबाईलवर परिणाम होतो.

अनेक रहस्यांनी भरलेल्या कथा

अनेकवेळा असं घडतं की, जेव्हा आपण एखाद्या नवीन व्यक्तीला भेटतो तेव्हा असे वाटते की, आपण त्याला आधीच भेटले आहे. आजही काळाच्या गूढतेवर संशोधन होतंय. असं असलं तरी तैमारा घाटीच्या गुपितांबद्दल अनेक किस्से विविध सोशल वेबसाईटवर आहेत. 

डॉ.प्रियदर्शी यांनी लोकांना फोनवर दिसणारी तारीख कुठेतरी लिहून ठेवा आणि येणाऱ्या काळात काय होतं याची वाट पहा, असा सल्ला दिला आहे.