close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

अरे बापरे ! सात वर्षांच्या मुलाच्या तोंडातून काढले ५२६ दात, डॉक्टरही चकित

सात वर्षांच्या मुलाच्या तोंडातून एक नाही, दोन नाही, पाच, दहा नाही तर तब्बल ५२६ दात काढण्यात आले 

अरे बापरे ! सात वर्षांच्या मुलाच्या तोंडातून काढले ५२६ दात, डॉक्टरही चकित

चेन्नई : एका सात वर्षांच्या मुलाच्या तोंडातून एक नाही, दोन नाही, पाच, दहा नाही तर तब्बल ५२६ दात काढण्यात आले. हे दात बाहेर काढणारे डॉक्टरही चकित झाले आहेत. डॉक्टरांच्या मते, जगातील हे पहिले प्रकरण असेल. ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीच्या तोंडातून इतके अनेक लहान दात काढले गेले आहेत.

तामिळनाडूची राजधानी चेन्नईमध्ये असे एक प्रकरण समोर आले, ज्यामुळे लोक एकदम हैराण झाले आहेत. दाताच्या डॉक्टरांनी सात वर्षांच्या निरागस मुलाच्या तोंडातून चक्क ५२६ बाहेर दात काढले आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे दात जबडाच्या हाडाशी इतके जोडलेले होते की ते बाहेरून दिसत नव्हते, असे डॉक्टरांनी सांगितले. 

डेंटिस्ट्सने शस्त्रक्रिया करुन ५२६ दात काढले. आता या बाळाच्या तोंडात २१ दात शिल्लक आहेत. खरे तर, मुलाला दात दुखीमुळे त्रस्त होता. या मुलाच्या उजव्या जबड्यात सूज आली होती. त्यामुळे त्याला रुग्णालयात आणले गेले होते. रुग्णालयातील ओरल आणि मॅक्सिलोफेसियल सर्जरी विभागातील प्राध्यापक पी. सेंथिलनाथन यांनी सांगितले, मुलाच्या पालकांना ही सूज तो तीन वर्षांचा असताना पाहिली होती. परंतु ही सूज इतकी फारशी नसल्याने, लक्ष दिले नाही. तसेच त्याला जास्त वेदना होन नव्हत्या. पालिकांनीही त्याला त्याबद्दल विचारणा केली, मात्र त्यानेही काहीही सांगितले नाही.

बाळाच्या तोंडात सूज आल्यानंतर मुलाचे पालक रुग्णालयात आले. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्याच्या पालकांनी मुलाच्या खालच्या उजव्या जबडाचे एक्स-रे आणि सीटी-स्कॅन केले. ज्यामध्ये अनेक लहान दात दिसले, त्यानंतर डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला.

सेंथीलनाथन यांनी सांगितले, आम्ही शस्त्रक्रिया करून मुलाच्या मुखातून लहान, मध्यम आणि मोठ्या आकाराचे ५२६ दात काढले. जबड्यातून हे छोटे दात काढण्यासाठी डॉक्टरांना पाच तास लागले. ओरल आणि मॅक्सिलोफेसियल पॅथॉलॉजी विभागाच्या प्रमुख आणि प्राध्यापक प्रतिभा रामानी यांनी सांगितले, तीन दिवसांच्या शस्त्रक्रियेनंतर मुलगा सामान्य स्थितीत आहे.