TCS कंपनीमध्ये फ्रेशर्सना नोकरीची मोठी संधी, 40 हजारांपेक्षा जास्त तरुणांची भरती

कोविड 19 मुळे सर्व देशभर असलेल्या साथीच्या आजाराशी संबंधित निर्बंधांमुळे भरती करण्यात काहीच अडचण येणार नाही.

Updated: Jul 10, 2021, 12:54 PM IST
TCS कंपनीमध्ये फ्रेशर्सना नोकरीची मोठी संधी, 40 हजारांपेक्षा जास्त तरुणांची भरती title=

मुंबई : देशाच्या सर्वात मोठ्या सॉफ्टवेअर कंपनी टीसीएसच्या (TCS)  एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, कंपनी 2021-22 या आर्थिक वर्षात 40 हजाराहून आधीक फ्रेशर्सची नेमणूक करणार आहे. टीसीएसचे जागतिक मानव संसाधन प्रमुख मिलिंद लक्कड़ यांनी पत्रकारांना सांगितले की, पाच लाखाहून अधिक कर्मचारी असलेल्या खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठ्या कंपनीने मागील वर्षी कॅम्पसमधून 40 हजार पदवीधरांची भरती केली होती आणि यावेळी ही संख्या अधिक असेल.

ते म्हणाले की, कोविड 19 मुळे सर्व देशभर असलेल्या साथीच्या आजाराशी संबंधित निर्बंधांमुळे भरती करण्यात काहीच अडचण येणार नाही. मागील वर्षी देखील 40 हजार लोकांना भरती केलं गेलं होतं. त्यामध्ये एकूण 3.60 लाख नवीन विद्यार्थी प्रवेश परीक्षेत उपस्थित होते.

लक्कड़ यांनी पत्रकारांना सांगितले, “आम्ही गेल्या वर्षी भारतातल्या परिसरातून 40 हजार लोकांना कामावर घेतले होते. यावर्षी आम्ही 40 हजार किंवा त्याहून अधिक लोकांना नोकरी देऊ.” यावर्षी भरती प्रक्रिया वेगाने होईल, असेही ते म्हणाले.

त्याचप्रमाणे गेल्या वर्षी अमेरिकन कॅम्पसमधून भरती झालेल्या दोन हजार इंटर्नर्सना देखील कामाची संधी मिळाली होती, असे त्यांनी सांगितले. परंतु त्यानंतर कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी एन. गणपती सुब्रमण्यम म्हणाले की, भारतात प्रतिभावंत लोकांची कोणतीही कमतरता नाही त्यामुळे आम्ही भारतीयांना संधी देणार आहोत.

दिल्लीत देखील तरुणांना नोकरीची संधी

लॉकडाऊन हटवण्याच्या प्रक्रियेनंतर रोजगाराच्या शोधात असलेले लोकं मोठ्या संख्येने दिल्ली सरकारच्या रोजगार बाजार पोर्टलवर आपले रजिस्ट्रेशन करत आहेत. दिल्ली सरकारने गुरुवारी निवेदनात म्हटले आहे की, जून महिन्यात प्रत्येक जिन पोर्टलवर सुमारे 300 नोकऱ्याची जाहिरात केली जात होती, तर या काळात दररोज सरासरी 1 हजार 92 लोक नोंदणी केली आहे.

यावर्षी 1 जून ते 30 जून या काळात पोर्टलवर नोकरी शोधत असलेल्या 34 हजार 212 लोकांनी नोंदणी केली. तर 9 हजार 522 नव्या रिक्त जागांवर जाहिराती पाठवण्यात आल्या आहेत. याशिवाय 2हजार 500 उमेदवाऱ्यांचे  संपर्क रोज व्हॉट्सअ‍ॅप, फोन कॉल्स आणि थेट (Interview) सुरू आहेत.

तसेच दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी jobs.delhi.gov.in हे पोर्टल सुरु केलं आहे. ज्यावर तुम्ही दिल्लीमधील नोकऱ्या शोधू शकता.