Tata Group च्या या स्टॉकने गुंतवणूकदार मालामाल; एका वर्षात 1 लाखाचे झाले 13 लाख

Tata Group Stock: टाटा ग्रुपच्या शेअर्सने 2021 या वर्षात चांगली कामगिरी केली आहे. 2022 मध्ये रेकॉर्डब्रेक कामगिरी करण्याच्या तयारीत आहेत. टाटा टेलिसर्व्हिसेसच्या शेअरमध्ये अजूनही दमदार रिटर्न्सचा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे.

Updated: Jan 10, 2022, 12:45 PM IST
Tata Group च्या या स्टॉकने गुंतवणूकदार मालामाल; एका वर्षात 1 लाखाचे झाले 13 लाख title=

मुंबई : Tata Group Stock : 2021 या वर्षाने शेअर बाजार गुंतवणूकदारांना मोठा परतावा दिला आहे. अनेक कंपन्यांच्या शेअर्सनी भरपूर पैसा कमावला. यामध्ये सर्वात लक्षवेधी ठरला तो टाटा समूह! टाटा समूहाच्या जवळपास सर्व शेअर्सने चांगली वाढ दर्शवली. परंतु, सर्वात विक्रमी कामगिरी टाटा टेलिसर्व्हिसेस महाराष्ट्र (TTML) या कंपनीने केली आहे. TTML देशातील टॉप 100 कंपन्यांमध्ये सामील झाली आहे.

कंपनीच्या शेअरने सोमवारच्या ट्रेडिंगमध्ये 5% च्या अप्पर सर्किटला स्पर्श केला आणि रु. 276.35 वर पोहोचला. कंपनीचा मार्केट कॅप 50,000 कोटींच्या पुढे गेला आहे. गेल्या तीन महिन्यांत शेअर 570 टक्क्यांहून अधिक मजबूत झाला आहे. TTML च्या शेअर्सने केवळ एका वर्षात सुमारे 2,800 टक्के परतावा दिला आहे.

मार्केट कॅप पहिल्यांदाच 50 हजार कोटींच्या पुढे

शेअर बाजारात कंपनीच्या लिस्टिंगनंतर पहिल्यांदाच मार्केट कॅप 50 हजार कोटींच्या पुढे गेली आहे. बीएसईच्या आकडेवारीनुसार, टीटीएमएलचे मार्केट कॅप 54.03 हजार कोटी रुपयांवर पोहोचले आहे. मार्केट कॅपनुसार ही देशातील 96 वी सर्वात मोठी कंपनी आहे.

मार्च 2020 नंतर, म्हणजे सुमारे दोन वर्षांत, कंपनीच्या स्टॉकने 14,567% चा विक्रमी परतावा दिला आहे. मार्च 2020 मध्ये शेअरची किंमत फक्त 1.80 रुपये होती. जानेवारी 2021 मध्ये या शेअरची किंमत 20 रुपये होती.

टाटा समूहाचा हिस्सा

TTML ही टाटा समूहाची मुंबईत दूरसंचार आणि क्लाउड सेवा पुरवणारी कंपनी आहे. TTML मध्ये टाटा समूहाच्या कंपन्यांचा 74.36% हिस्सा आहे. यामध्ये टाटा सन्सचा 19.58 टक्के आणि टाटा पॉवर कंपनीचा 6.48 टक्के वाटा आहे. कंपनीच्या शेअरमध्ये अजूनही तेजी कायम आहे. या शेअरमध्ये आणखी वाढ होऊ शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे. कंपनीचा ताळेबंद खूपच मजबूत दिसत आहे.