इंडिया बुल्स आणि टाटा हाऊसिंग ग्राहकांना ३.९९ % व्याजदरात देणार घरं

अन्न, वस्त्र, निवारा या तीन मुलभूत गरजा आहेत.

Updated: Nov 11, 2017, 12:28 PM IST
इंडिया बुल्स आणि टाटा हाऊसिंग ग्राहकांना ३.९९ % व्याजदरात देणार घरं  title=

मुंबई : अन्न, वस्त्र, निवारा या तीन मुलभूत गरजा आहेत.

लहान पण हक्काचं घर असावं या स्वप्नासाठी अनेकांची कित्येक वर्ष पणाला लागतात. घरासाठी कर्ज काढून आर्थिक गणितं बसवणं कठीण काम आहे. पण हे थोडं सुकर करण्यासाठी टाटा हाऊसिंग आणि इंडियाबुल्स एकत्र प्रयत्न करणार आहेत. 

टाटा हाऊसिंगच्या ११ प्रोजेक्ट्साठी त्यांनी एकत्र येऊन ३.९९ इतक्या माफक व्याज दरावर घरं उपलब्ध केली आहेत. सध्या इतर बॅकांचा विचार करता घरासाठी व्याजदर ८.५ इतका आहे. 

इंडिया बुल्स आणि टाटा हाऊसिंग यांनी एकत्र येऊन मॉनिटाईज इंडिया हे नवं अभियान सुरू केलं आहे. त्यामुळे अनेकांची हक्काचं घर घेण्याचं स्वप्न पूर्ण होणार आहे. ग्राहकांना घर घेण्यासाठी उपलब्ध करून दिलेला हा नवा व्याजदर सुरवातीच्या पाच वर्षांचा काळासाठी उपलब्ध राहील. 

इंडिया बुल्स आणि टाटा हाऊसिंग यांनी आणलेली ही खास ऑफर १२ डिसेंबर २०१७ पर्यंत सात विविध शहरांमध्ये आणि ११ प्रोजेक्टवर उपलब्ध राहणार आहे.  

मंदीच्या चक्रामध्ये अडकलेल्या रिएल्टी सेक्टरला या मुळे नवी चालना मिळण्याची शक्यता आहे. तसेच रिएल इस्टेटमध्ये गुंतवणूक करणार्‍यासाठी हा पर्याय एक चांगली संधी असल्याचे समजले जात आहे.