मुंबई : इनकम टॅक्स न भरणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी. जे लोक इनकम टॅक्स भरत नाहीत त्यांच्यासाठी सरकार नियम अधिक कठोर करणार आहे. 1 जुलैपासून टॅक्स अशा लोकांकडून अधिक TDS आणि TCS वसूल केला जावू शकतो. अशा लोकांची ओळख पटवण्यासाठी आयकर विभागाने एक नवी व्यवस्था तयार केली आहे. ज्यानुसार 1 जुलैपासून अधिक टॅक्स भरावा लागणार आहे.
CBDT issues Circular No. 11 of 2021 dt 21.06.2021 on implementation of section 206AB & 206CCA wrt higher tax deduction/collection for certain non-filers. New functionality issued for compliance checks for sec 206AB & 206CCA to ease compliance burden of tax deductors/collectors. pic.twitter.com/1DP39BKVZi
— Income Tax India (@IncomeTaxIndia) June 21, 2021
2021 च्या अर्थसंकल्पात एका तरतूदीचा समावेश करण्यात आला, ज्यानुसार दोन वर्षांपर्यंत इनकम टॅक्स फाईल न केल्यास सरकार TDS (Tax Deducted at Source) आणि TCS (Tax Collected at Source) आकारणार. त्यामुळे वेळेतचं इनकम टॅक्स फाईल करा.
सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस (सीबीडीटी) देखील याबाबत एक परिपत्रक जारी केले आहे. सेक्शन 206AB आणि 206CCA तर्गत रिटर्न न भरणाऱ्यांवर जास्त टीडीएस / टीसीएस लावण्याचे म्हटले आहे. 1 जुलैपासून नवीन नियम लागू होणार आहेत.