शोपियांमध्ये CRPF पथकावर दहशतवादी हल्ला; गोळीबारात 1 नागरिक ठार

सीआरपीएफच्या जवानांचं दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर 

Updated: Oct 24, 2021, 12:58 PM IST
शोपियांमध्ये CRPF पथकावर दहशतवादी हल्ला; गोळीबारात 1 नागरिक ठार

शोपियां : जम्मू-काश्मीरच्या (Jammu-Kashmir) शोपियांनमध्ये सीआरपीएफच्या (Shopian) टीमवर दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. बाबापोरा (Babapora) परिसरात हा हल्ला झाला. सीआरपीएफच्या जवानांनीही दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. मात्र, या दरम्यान एका सामान्य नागरिकाचा मृत्यू झाला. पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, अनंतनाग येथील शाहिद एजाज असे मृत व्यक्तीचे नाव आहे. दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात एजाजला गोळी लागली आणि त्याचा मृत्यू झाला.

त्यांनी पुढे सांगितले की, दहशतवादी हल्ल्यानंतर सीआरपीएफच्या पथकाने संपूर्ण परिसराला घेरलं असून शोध मोहीम सुरू केली आहे. दहशतवाद्यांना पळून जाणे अवघड झालं आहे. जम्मू -काश्मीरच्या पूंछमध्ये दहशतवाद्यांनी जम्मू -काश्मीर पोलिसांच्या संयुक्त पथकावर हल्ला केला. ज्यामध्ये 3 जवान जखमी झाले. 

जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. पूंछमध्ये 13 दिवसांपासून सुरक्षा दलांचे ऑपरेशन सुरू होते. दहशतवाद्यांचे अड्डे ओळखण्यासाठी सुरक्षा दलाचे एक पथक लष्कर-ए-तैयबाचा दहशतवादी झिया मुस्तफासह घटनास्थळी गेले. या गोळीबारात दहशतवादी झिया मुस्तफाही जखमी झाला. हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे.