close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

अवंतीपोरामध्ये एका दहशतवाद्याला कंठस्नान; मोठा शस्त्रसाठा जप्त

अवंतीपोरा शहरापासून काही अंतरावर ही चकमक झाली.

Updated: Oct 8, 2019, 11:06 AM IST
अवंतीपोरामध्ये एका दहशतवाद्याला कंठस्नान; मोठा शस्त्रसाठा जप्त

नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या अवंतीपोरा शहरात मंगळवारी सकाळी झालेल्या चकमकीत भारतीय सुरक्षादलांनी एका दहशतवाद्याला कंठस्नान घातले. यावेळी घटनास्थळावरून मोठ्याप्रमाणावर शस्त्रास्त्रांचा साठा जप्त करण्यात आला. परंतु, अजूनपर्यंत या दहशतवाद्याची ओळख पटलेली नाही. 

काश्मीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अवंतीपोरा शहरापासून काही अंतरावर ही चकमक झाली. याठिकाणी दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर लष्कराने परिसराला घेराव घातला. 

पाकिस्तानमधून दहशतवादी मोठ्याप्रमावर काश्मीरमध्ये घुसखोरीच्या प्रयत्नात आहेत. त्यासाठी दहशतवाद्यांकडून गेली अनेक वर्षे वापरात नसलेल्या मार्गांचा वापर होत असल्याचे दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वीच लष्कराने सिंधू खोऱ्यातील गुरेज विभागातून घुसखोरीच्या प्रयत्नात असलेल्या दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले होते. या भागातून सहा वर्षानंतर घुसखोरीचा प्रयत्न झाल्याचे लष्कराकडून सांगण्यात आले.