भारतीय हवाई दलाकडून सामर्थ्याचे प्रदर्शन

गाझियाबादमधील हिंडन एयरबेसवर विशेष कार्यक्रमाचे आयोजन

Updated: Oct 8, 2019, 10:58 AM IST
भारतीय हवाई दलाकडून सामर्थ्याचे प्रदर्शन title=
फोटो सौजन्य : एएनआय

गाझियाबाद : भारतीय हवाई दल आज ८७वा स्थापना दिवस साजरा करत आहे. यानिमित्ताने गाझियाबादमधील हिंडन एयरबेसवर विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी हवाई दलातील अनेक वरिष्ठ अधिकारी सामिल झाले आहेत. या कार्यक्रमादरम्यान हवाईदलाचे जवान शानदार प्रदर्शन करणार आहेत. 

या कार्यक्रमादरम्यान ५४ लढाऊ विमान परेड (Fly Past) होणार आहे. या परेडमध्ये पहिल्यांदाच जगातील सर्वात उत्तम हेलिकॉप्टर शिनूक आणि सर्वात खतरनाक जंगी हेलिकॉप्टर अपाचे आपले शौर्य दाखवणार आहेत.

स्वदेशी फायटर जेट तेजसशिवाय सुखोई ३० MKI, मिग २९ अपग्रेड, जग्वार असे एयरक्राफ्टही परेडमध्ये आपली कामगिरी दाखवणार आहेत. 

भारतीय हवाई दलाच्या स्थापना दिनी विंग कमांडर अभिनंदन वर्धमान  आणि मिंटी अग्रवाल यांना सन्मानित करण्यात येणार आहे.   

हवाई दलाच्या कार्यक्रमावेळी हिंडन एयरबेसवर हवाईदलाचा झेंडा घेऊन आकाशगंगा स्कायडायव्हिंग टीमने आपल्या कामगिरीसह कार्यक्रमाची सुरुवात केली.

आर्मी प्रमुख बिपिन रावत, भारतीय हवाई दल प्रमुख आरके सिंह भदौरिया आणि नौसेनाध्यक्ष करमबीर सिंह, सचिन तेंडुलकरही या कार्यक्रमासाठी सामिल झाले आहेत. 

भारतीय हवाई दलाची आकाश गंगा टीम, गरुड कमांडो यूनिट, एयर वॉरियर शो आणि विंटेज म्हणजेच जुन्या ट्रेनर विमानापासून मेक-इन-इंडिया थीम अंतर्गत बनलेल्या विमानांची कामगिरी दाखवण्यात येणार आहे. 

८ ऑक्टोबर १९३२ मध्ये हवाई दलाची स्थापना करण्यात आली. स्वातंत्र्यापूर्वी हवाईदलाला रॉयल इंडियन एयरफोर्स या नावाने ओळखले जात होते.