जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून ग्रेनेड हल्ला; ५ जखमी

या ग्रेनेड हल्ल्यात ५ जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे

Updated: Oct 12, 2019, 04:47 PM IST
जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून ग्रेनेड हल्ला; ५ जखमी
संग्रहित फोटो

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील (Jammu Kashmir) हरी सिंह रस्त्यावर दहशतवाद्यांनी शनिवारी ग्रेनेड हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. दहशतवाद्यांद्वारे केल्या गेलेल्या या ग्रेनेड हल्ल्यात ५ जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या हल्ल्यात जखमी झालेल्या लोकांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते आहे. 

हल्ल्याच्या काही वेळातच पोलीस आणि सुरक्षादलाकडून संपूर्ण परिसरात घेराव घालण्यात आला आहे. सुरक्षादलाकडून हल्लेखोरांचा शोध सुरु असून परिसरात सर्च ऑपरेशन सुरु आहे. 

गेल्या शनिवारीही जम्मू - काश्मीरमधील अनंतनाग (Anantnag) जिल्ह्यात उपायुक्त कार्यालयाबाहेर ग्रेनेड हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात जवळपास १० जण जखमी झाले असल्याचे सांगण्यात आले होते.