हिवाळ्याच्या धर्तीवर सरकारची नवी योजना; रेशनकार्ड धारकांना असा घेता येणार लाभ

प्रत्येक भारतीय नागरिकासाठी शिधापत्रिका किती महत्त्वाची आहे हे आपल्याला माहितच आहे. रेशन कार्डच्या मदतीने तुम्ही अनेक सरकारी सुविधांचा लाभ घेऊ शकता. या सुविधांमध्ये स्वस्त रेशनचाही समावेश आहे. ज्या कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न कमी आहे, तसेच लाखो कुटुंबे त्याचा वापर करून जीवन जगत आहेत अशा कुटुंबांसाठी रेशन कार्ड ही एक महत्त्वाची सुविधा आहे. 

Updated: Oct 28, 2022, 07:50 PM IST
हिवाळ्याच्या धर्तीवर सरकारची नवी योजना; रेशनकार्ड धारकांना असा घेता येणार लाभ title=

Good News for Ration Card Holders: रेशनकार्ड (Ration Card Holder) धारकांसाठी आनंदीची बातमी आहे. दिवाळीच्या शुभूर्तावर सरकारने रेशनकार्ड धारकांसाठी दिवाळी गिफ्ट दिलं आहे. यामध्ये तुम्हाला पौष्टिक अन्नधान्यांची सुविधा उपलब्ध होणार आहे. गुलाबी कार्डधारकांना आता लवकरच एक गुडन्यूज मिळणार आहे. (good news ration card holder haryana govt to distribute millet in november)

प्रत्येक भारतीय नागरिकासाठी शिधापत्रिका किती महत्त्वाची आहे हे आपल्याला माहितच आहे. रेशन कार्डच्या मदतीने तुम्ही अनेक सरकारी सुविधांचा लाभ घेऊ शकता. या सुविधांमध्ये स्वस्त रेशनचाही समावेश आहे. ज्या कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न कमी आहे, तसेच लाखो कुटुंबे त्याचा वापर करून जीवन जगत आहेत अशा कुटुंबांसाठी रेशन कार्ड ही एक महत्त्वाची सुविधा आहे. 

हवामानातील बदलामुळे हरियाणाच्या अन्न आणि पुरवठा विभागाने ग्राहकांच्या रेशनमध्ये बदल केला आहे. हिवाळी हंगाम सुरू झाल्यावर विभागाकडून गव्हासह बाजरी ग्राहकांना वितरित केली जाईल. याचा फायदा ग्राहकांना उचलता येणार आहे. 

हेही वाचा - Samantha Ruth Prabhu ची डिमांड आणखी वाढली... आता घेणार 'इतके' कोटी रूपयांचं मानधन?

जर तुमच्याकडे रेशन कार्ड असेल आणि तुम्ही सरकारी अन्न योजनेचा लाभ घेत असाल तर ही बातमी तुमच्या उपयोगाची आहे. हवामानातील बदलामुळे हरियाणाच्या अन्न आणि पुरवठा विभागाने ग्राहकांच्या रेशनमध्ये बदल केला आहे. हिवाळी हंगाम सुरू झाल्यावर विभागाकडून गव्हासह बाजरी ग्राहकांना वितरित केली जाईल. यासाठी हरियाणाच्या जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनाही कळवण्यात आले आहे.

हरियाणा राज्यातील सर्व डेपोवर कार्डधारकांना गहू वितरित केला जात होता. मात्र हिवाळा सुरू झाल्याने ग्राहकांचे आरोग्य लक्षात घेऊन सरकारने बाजरी वाटण्याचा निर्णय घेतला आहे. वास्तविक बाजरी ही गरम असते आणि त्याचा फायदा आपल्या आरोग्याला होऊ शकतो. हिवाळ्यात त्याचे सेवन फायदेशीर ठरते. आता 1 नोव्हेंबरपासून सर्व कार्डधारकांना सरकारकडून बाजरीही वितरित केली जाणार आहे.  

हेही वाचा - टेलिव्हिजन अभिनेत्रीकडून बॉलिवूडची पोलखोल... नेपोटिझमवर केलं खरमरीत वक्तव्य

गुलाबी शिधापत्रिकाधारकांना शासनाकडून 18 किलो गहू आणि 17 किलो बाजरी दिली जाणार आहे. याशिवाय पिवळे व खाकी शिधापत्रिकाधारकांना प्रति युनिट 2.5 किलो गहू आणि 2.5 किलो बाजरी वाटप करण्याची तरतूद आहे. याखेरीज प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना (PMGKY) अंतर्गत कार्डधारकांना स्वतंत्रपणे गहू मोफत मिळेल.

1 नोव्हेंबर 2022 पासून राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये रेशनचे वितरण सुरू होणार आहे. त्यासाठीची परवानगी यापूर्वीच मिळाली आहे.