समस्त देशवासियांचे लक्ष लागून राहिलेल्या चांद्रयान २ ने पाचवी आणि अखेरची कक्षेत सुधारणा करून यानाला चंद्राभोवती ११९ बाय १२७ किलोमीटरच्या कक्षेत प्रस्थापित करण्यात भारतीय अवकाश संशोधन संस्थेला (इस्रो) रविवारी यश आले. चंद्रावर पाण्यासह आणखी नवीन गोष्टी शोधन्याचा 'चांद्रयान २'चा मानस आहे. रविवारी संध्याकाळी ६:२१ मिनिटांनी यानाचे इंजिन प्रज्वलित करण्यात आले होते. हे इंजिन प्रज्वलीत करून यानात सुधारना करण्यात आली.
अवकाशात झेपावलेलं हे चांद्रयान सुमारे ४८ दिवसांत चंद्रावर पोहोचणार आहे. आज दुपारी १२:४५ मिनिटे ते १:४५ मिनिटांच्या कालावधीत विक्रम लँडर आणि प्रग्यान रोव्हर मुख्य यानापासून वेगळे केले जातील.
त्यानंतर, विक्रम लँडरला चंद्राच्या जमिनीवर उतरण्याचा प्रयत्न सुरू होतील. ७ सप्टेंबर रोजी पहाटे ०१:३० ते ०२:३० दरम्यान लँडर आणि रोव्हरला चंद्रावर उतरवण्याची प्रक्रिया पार पाडली जाईल.
यापूर्वी 'चांद्रयान २'ने LI4 या कॅमेऱ्याच्या साथीने ही छायाचित्र टीपली होती. 'चांद्रयान २' ने दुसऱ्या कक्षेत पुढच्या दिशेने प्रवास सुरु केल्यानंतर काही दिवसांनीच इस्रोने पृथ्वीची काही लक्षवेधी छायाचित्र प्रसिद्ध केली होती.