ITR भरण्यासाठी उरले फक्त 24 तास... वेळ चुकली तर होईल मोठं नुकसान

जर तुम्ही टॅक्स भरला नाही तर तुमचे खूप मोठे नुकसान होऊ शकते. 

Updated: Jul 30, 2022, 07:20 PM IST
ITR भरण्यासाठी उरले फक्त 24 तास... वेळ चुकली तर होईल मोठं नुकसान title=

ITR filling last late: 2021-22 या आर्थिक वर्षातील income tax भरण्याची शेवटची तारीख खूपच जवळ आली असून आता ITR भरण्यासाठी फक्त 24 तासच उरले आहे. ज्यांनी आपला टॅक्स भरला नसेल त्यांनी लवकरच आपला टॅक्स भरणे अनिवार्य आहे कारण जर तुम्ही टॅक्स भरला नाही तर तुमचे खूप मोठे नुकसान होऊ शकते. 

अद्याप तरी टॅक्स भरण्यासाठी मुदत वाढवून दिलेली नाही त्यामुळे ज्यांनी टॅक्स भरला नसेल त्यांना आता चांगलीच कंबर कसावी लागणार आहे. जर तूम्ही असेच टॅक्स भरण्याची मुदत वाढेल या अपेक्षेने वाट पाहत बसाल तर तुमचे खूपच मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. 

income tax act नूसार returns न भरणांऱ्या त्याच्याविरोधा खटला अथवा तरूंगातही पाठवले जाऊ शकते. यावर्षी ITR भरण्याची शेवटीची तारिख ही  31 जूलै आहे. या दिवसानंतर जर तूम्ही कर भरायला गेलात तर तूम्हाला 5,000 रुपयांपर्यंत विलंब शुल्क देखील भरावे लागेल. करदात्याचे वार्षिक करपात्र उत्पन्न 5 लाख रुपयांपेक्षा जास्त असल्यास 5,000 तर उत्पन्न 5 लाखांपेक्षा कमी असल्यास 1,000 रुपये लेट फी भरावी लागेल.

काय होईल नुकसान...
जर एखादी व्यक्ती निर्धारित वेळेत रिटर्न भरू शकली नाही तर income tax department त्याच्या एकूण थकबाकीच्या 50 टक्के ते 200 टक्के इतका दंड दाखल करू शकतो. एवढेच नाही तर विभागाकडून त्याला नोटीसही बजावली जाईल आणि रिटर्नची अंतिम मुदत संपल्यानंतर आयटीआर दाखल करेपर्यंत दररोज व्याजही आकारले जाईल तसेच करदात्यावर कारवाई करण्याचे अधिकारही विभागाला आहेत. तेव्हा अशी कारवाई नको असेल तरी अजिबात वेळ घालवू नका लवकरच ITR file करा.