पॅनकार्ड-आधार जोडणीची मुदत पुन्हा वाढवली

पॅनकार्ड आधार नंबर सोबत लिंक करण्यासाठी शेवटची संधी ३० जून २०१८ पर्यंत होती. ती वाढवून ३१ मार्च २०१९ पर्यंत करण्यात आली आहे.

Updated: Dec 16, 2018, 06:01 PM IST
पॅनकार्ड-आधार जोडणीची मुदत पुन्हा वाढवली title=

मुंबई : प्रत्येक कामासाठी ओळखपत्र म्हणून पॅनकार्ड किंवा आधार कार्ड गरजेचे झाले आहे. सरकारने पॅनकार्डसोबत आधार नंबर जोडणं बंधनकारक केलं आहे. ज्यांनी अजून पॅनसोबत आधार नंबर जोडलेला नाही, त्यांच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे. सरकारने पॅन-आधार कार्ड नंबर जोडण्याची मुदत वाढवली आहे. तुम्ही ३१ मार्च २०१९ पर्यंत पॅनकार्ड सोबत लिंक करु शकता. तुम्ही जर पॅनसोबत आधार लिंक केले नाहीत तर तुमचे पॅनकार्ड कलम १३९ पोटकलम (अअ) नुसार रद्द केले जाईल. 

या अडचणी येतील

जर तुम्ही पॅनकार्ड आधार सोबत जोडलं नसेल तर, तुम्हाला आयकर रिटर्न भरता येणार नाही. सोबतच तुमचं टॅक्स रिफंड मिळू शकणार नाही. तसेच पॅनकार्ड रद्द होईल. पॅनकार्ड आधार नंबर सोबत लिंक करण्यासाठी शेवटची संधी ३० जून २०१८ पर्यंत होती. ती वाढवून ३१ मार्च २०१९ पर्यंत करण्यात आली आहे.

असं करा लिंक

पॅनकार्ड आधारसोबत जोडण्यासाठी तुम्हाला बॅंकेत जाण्याची गरज नाही. तुम्ही ते घरबसल्या देखील करु शकता. यासाठी तुम्हाला आयकर विभागाच्या वेबसाईटवर जावं लागेल. www.incometaxindiaefiling.gov.in  या लिंकवर क्लिक करायंच. वेबसाईटवर गेल्यानंतर तिथे link aadhar  ऑप्शनवर क्लिक करा. जर तुमचं खाते नसेल तर तुम्हाला त्याची नोंदणी करावी लागेल. लॉग-इन केल्यानंतर पेज ओपन होईल. पेज ओपन केल्यानंतर तिथे blue strip  ऑप्शन मध्ये गेल्यावर profile setting टॅबवर aadhar link चा ऑप्शन दिसेल. हा पर्याय निवडा. इथे दिलेल्या रकान्यात आपला आधार क्रमांक आणि ओटीपी नंबर द्यावा लागणार आहे. माहिती भरुन झाल्यावर link aadhar  ऑप्शन निवडा.

मोबाईलवरुन लिंक करा

तुमच्या मोबाईलवरुन सुद्धा तुम्ही पॅन कार्ड आधारसोबत लिंक करु शकता. मोबाईलवरुन तुम्ही एसएमएसच्या मदतीने तुम्ही पॅनकार्ड आधारसोबत लिंक करु शकता. यासाठी मोबाईलमध्ये UIDPAN टाईप करुन तुमचा १२ अंकी आधार नंबर आणि पॅन नंबर टाका. यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवरुन ५६७६७८ आणि ५६१६१ यानंबर वर पाठवू शकता.