close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

शहीद भारतीय जवान औरंगजेबच्या हत्येचा जवानांनी घेतला बदला

चकमकीत ३ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे.

Updated: May 18, 2019, 04:16 PM IST
शहीद भारतीय जवान औरंगजेबच्या हत्येचा जवानांनी घेतला बदला

श्रीनगर : जम्मू काश्मीरमध्ये जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत ३ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपोरामध्ये ही चकमक झाली. अनंतनागमध्ये चकमक सुरु असल्याची माहिती समोर येते आहे. मारण्यात आलेल्या दहशतवाद्यांमध्ये शौकत अहमद डाल याचा देखील समावेश आहे. शहीद जवान औरंगजेब यांच्या हत्येत याचा समावेश होता.

अवंतीपोराच्या पंजगाम गावात सकाळी 130 बटालियन सीआरपीएफ, 55 आरआर आणि स्पेशल ऑपरेशन ग्रुप (एसओजी) ने ही कारवाई केली.

जम्मू-काश्मीरमध्ये काही भागात दहशतवादी हल्ल्याची शक्यता आहे. येथे अलर्ट जारी करण्यात आला आहे. खोऱ्यात दहशत पसरवण्यासाठी दहशतवादी प्रयत्न करत आहेत. त्यामुळे येथे अलर्ट घोषित करण्यात आला आहे.

जम्मू-काश्मीर काही दिवसांपासून दहशतवाद्यांसोबत चकमक वाढली आहे. त्यामुळे पाकिस्तानातून येणाऱ्या दहशतवाद्यांसोबतच खोऱ्यातील दहशतवाद्यांचा देखील सामना करावा लागत आहे. गुरुवारी देखील पुलवामामध्ये ३ दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं होतं.