Haunted Railway Station: भारतीय रेल्वे स्थानकातील हा किस्से आजही चर्चेत आहेत. भारतातील एक रेल्वे स्थानक 42 वर्षांपर्यंत बंद होते. हे स्थानक बंद होण्यामागेही एक गोष्ट सांगितली जाते. पश्चिम बंगालमध्ये असलेले बेगुनकोडोर असं या स्थानकाचे नाव आहे. पुरुलिया जिल्ह्यात हे स्थानक असून 1960मध्ये हे सुरू करण्यात आले होते. या स्थानकातून ट्रेनतर जात होत्या मात्र, 42 वर्ष स्थानकात एकही ट्रेन थांबली नाही. हे स्थानक अचानक का बंद झाले या मागे एक गोष्ट सांगितली जाते.
बेगुनकोडोर स्थानक सुरू करण्यासाठी संथालची रानी श्रीमती लाचन कुमारी यांनी योगदान दिले होते. रेल्वे स्थानक सुरू झाल्यानंतर काही वर्षांपर्यंत सगळकाही व्यवस्थित सुरू होते. मात्र, त्यानंतर एकदिवस अचानक विचित्र घटना सुरू झाल्या. 1967 साली स्थानकात काम करणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्याने तिथे महिलेचे भूत बघितल्याचा दावा केला होता. त्याने ही गोष्ट त्याच्यासोबत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही सांगितली होती. मात्र, त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला नाही व दुर्लक्ष केले.
मात्र, त्यानंतर काहीच दिवसांत अशी एक घटना घडली की सर्व कर्मचाऱ्यांना त्याच्यावर विश्वास ठेवणे भाग पडले. कर्मचाऱ्याने भूत पाहिल्यानंतर बेगुनकोडोरच्या स्टेशन मास्तर आणि त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांचा मृत्यू झाला होता. लोकांचा असा दावा आहे की, यामागे त्याच महिलेच्या भूतामुळं ही घटना घडली. त्यानंतर लोकांनी या भूताबाबत अनेक गोष्टी सांगितल्या जाऊ लागल्या.
तिथे राहणाऱ्या लोकांचा दावा आहे की, सूर्य मावळल्यानंतर एखादी ट्रेन स्टेशनवरुन जात असताना त्या महिलेचे भूत ट्रेनपेक्षाही फास्ट पळते. इतकंच नव्हे तर ते भूत ट्रेनसोबतच पळू लागते. अनेकदा तर रेल्वेच्या रुळांवर ही महिलेचे भूत पाहिलं गेलं आहे. या घटनानंतर रेल्वे स्थानकावर भूताटकी असल्याचे बोलले जाऊ लागले. लोकांच्या मनात या स्थानकाबद्दल इतकी भिती बसली की लोकांनी तिथे येणे-जाणे बंद केले. रेकॉर्डमध्येही ही गोष्ट नोंद करण्यात आली. इतकंच नव्हे कर, याची गोष्ट कोलकाता रेल्वे स्थानकातील रेल्वे मंत्रालयापर्यंत पोहोचली.
रेल्वे कर्माचारीही इथे काम करण्यासाठी तयार होत नव्हते. ज्या लोकांना तिथे नियुक्त केले जायचे ते तिथे जाण्यास विरोध करत होते. नंतर नंतर तिथे ट्रेन थांबणेही बंद झाले. कारण त्या स्टेशनमधून कोणताही प्रवासी ट्रेन पकडतच नव्हता.
लोको पायलटदेखील हे स्थानक जवळ आल्यास ट्रेनचा स्पीड वाढवत असे. जेणेकरुन लवकरात लवकर हे स्थानक क्रॉस करता येऊ शकेल. तर, प्रवासीदेखील हे स्थानक आल्यावर खिडकी व दरवाजे बंद करुन घ्यायचे. तब्बल 42 वर्षांपर्यंत असेच चालु होते. मात्र, 2009मध्ये गावकऱ्यांच्या मागणीनंतर तत्कालीन रेल्वे मंत्री ममता बॅनर्जी यांनी हे रेल्वे स्थानक पुन्हा सुरू केले. मात्र, आता या अफवा कोणीही भूत बघितल्याचा दावा करत नाही. मात्र, अजूनही रात्रीच्यावेळी स्थानकात कोणीही थांबत नाही. आता या स्थानकात जवळपास 10 ट्रेन थांबतात.