अनेकदा प्रदूषित हवा ही बाहेरची असते असा समज आहे. पण घरातील म्हणजे Indoor Pollution बदद्ल फार बोललं जात नाही. किंबहुना या प्रदूषणाबद्दल लोकांना कल्पनाच नाही. Indoor Pollution तुमचं शरीर आतून दररोज हळूहळू पोखरत असतं. अनेक आजारांना आणि रोगप्रतिकारशक्ती कमी करण्यास Indoor Pollution कारणीभूत ठरतं. आज National Pollution Control Day आहे. या निमित्ताने प्रदूषण नेमकं कसे होते आणि त्यावर उपाय काय हे समजून घेऊ शकते.
मुंबईसह अनेक शहरांमध्ये हवेचं प्रदूषण वाढल्याची नोंद झाली आहे. हे प्रदूषण कंट्रोल करण्यासाठी सरकार आणि इतर संस्था कार्यरत आहेत. पण नागरिकांना कल्पनाच नाही की, प्रदूषण फक्त घरा बाहेर नाही तर हवेचं प्रदूषण घरात देखील आहे.
महत्त्वाचं म्हणजे हे Indoor Pollution तुम्हाला सहज डोळ्यांनी दिसत नाही. पण हे प्रदूषण तुमचं शरीर आतून पोखरत आहे. एवढंच नव्हे तर दररोज संपर्कात आल्यामुळे तुमची रोगप्रतिकारशक्ती कमी करण्यास कारणीभूत ठरले.
घरातील प्रदूषणाचे कारण
लाकूड, कोळसा किंवा रॉकेलच्या चुलीतून निघणारा धूर
एसी, हिटर आणि कुलर यांसारख्या उपकरणांमधून उत्सर्जित होणारे हानिकारक वायू
पेंट, साफसफाईची रसायने, एअर फ्रेशनर आणि कीटकनाशके
घराच्या कानाकोपऱ्यात धूळ आणि घाण साचलेली
सिगारेट आणि बिडीचा धूर
पाळीव प्राण्यांचे केस आणि त्वचेचे कण
डॉ. रमाकांत शर्मा यांच्या मते, घरातील प्रदूषणामुळे फुफ्फुसाचा संसर्ग, दमा आणि ब्राँकायटिस यांसारख्या फुफ्फुसाच्या विविध समस्या उद्भवू शकतात. याशिवाय धूळ आणि रसायनांमुळे ॲलर्जी आणि त्वचेच्या समस्या वाढू शकतात. रासायनिक वायूंमुळे डोळ्यांची जळजळ आणि डोकेदुखी होऊ शकते. घरातील प्रदूषणाच्या दीर्घकाळ संपर्कामुळे हृदयरोग आणि फुफ्फुसाचा कर्करोग होण्याचा धोका वाढतो.
खिडक्या आणि दरवाजे उघडा जेणेकरून घरात वेंटिलेटर चांगले राहिल.
स्वच्छतेसाठी रसायनांऐवजी नैसर्गिक उत्पादने वापरा.
घरामध्ये देखील इनडोअर रोपे लावा. घरातील प्रदूषण कमी करण्यासाठी ही झाडे उपयुक्त ठरतील.
घरामध्ये सिगारेट आणि विडी पिणे टाळा.
स्वयंपाकघरात एक्झॉस्ट फॅन वापरण्याची खात्री करा जेणेकरून धूर बाहेर येऊ शकेल.
घराचे कोपरे आणि फर्निचर नियमितपणे स्वच्छ करा जेणेकरून धूळ साचणार नाही.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)