'या' भारतीय कंपनीचे 500 कर्मचारी झाले कोट्याधीश! 70 जणांना मिळाले प्रत्येकी 8.5 कोटी रुपये

500 Employees Of This Company Will Become Crorepati: या कंपनीकडून एक दोन नाही तर तब्बल 500 कर्मचाऱ्यांना प्रत्येकी किमान एक कोटी रुपये दिले जाणार आहेत. नेमकी ही कंपनी आहे तरी कोणती आणि का दिले जाणार आहेत हे पैसे जाणून घ्या.

स्वप्निल घंगाळे | Updated: Nov 14, 2024, 12:27 PM IST
'या' भारतीय कंपनीचे 500 कर्मचारी झाले कोट्याधीश! 70 जणांना मिळाले प्रत्येकी 8.5 कोटी रुपये title=
पाच हजार कर्मचाऱ्यांना होणार फायदा (प्रातिनिधिक फोटो रॉयटर्सवरुन साभार)

500 Employees Of This Company Will Become Crorepati: तुमच्या मोबाईलमध्ये असलेल्या एका प्रसिद्ध कंपनीत काम करणारे 70 आजी-माजी कर्मचारी कोट्याधीश होणार आहेत. या कंपनीचं नाव आहे स्वीगी! या 70 कर्मचाऱ्यांना प्रत्येकी 8.5 कोटी रुपये रक्कम मिळमार आहे. कंपनीने 13 नोव्हेंबर रोजी बोनसची घोषणा केली असून शेअर मार्केमध्ये लिस्ट झाल्यानंतर सर्वाधिक लाभ या 75 जणांना होणार असल्याची माहिती 'मनीकंट्रोल'ने दिली आहे. स्वीगीचा 11 हजार 327 कोटींचा आयपीओ हा नव्या कंपनीचा सर्वात मोठा आयपीओ ठरला आहे. त्यामुळेच या कंपनीच्या शेअर होल्डर्सला मोठा फायदा झाला आहे.

500 जण होणार कोट्याधीश

कंपनीच्या 5000 हजार कर्मचाऱ्यांपैकी 75 कर्मचाऱ्यांना शेअर मार्केटमध्ये कंपनीला मिळालेल्या उस्फुर्त प्रतिसादाचा फायदा होणार आहे. कंपनीने एकूण 9 हजार कोटींची रक्कम या पाच हजार कर्मचाऱ्यांना वाटण्याचा निर्णय घेतला आहे. या पाच हजार कर्मचाऱ्यांपैकी 500 जणांना प्रत्येकी किमान एक कोटी रुपये मिळणार आहेत. याच 500 जणांमध्ये 70 जण असे आहेत ज्यांना प्रत्येकी 8.5 कोटी रुपये मिळणार आहेत. स्वीगीच्या ईएसओपी पेआऊटच्या माध्यमातून हा लाभ कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. 

ईएसओपी म्हणजे काय?

ईएसओपी म्हणजेच एम्पलॉइ स्टॉक ऑप्शन्स हे कंपनीकडून कम्पसेशन म्हणून कर्मचाऱ्यांना दिले जाणारे शेअर्स असतात. जितका जास्त काळ कर्मचारी कंपनीबरोबर काम करणार तितका अधिक फायदा त्याला या ईएसओपीच्या माध्यमातून मिळतो. हे शेअर्स दिर्घकाळासाठी दिले जातात. त्यामुळे कर्मचारी अधिक वेळ कंपनीबरोबर काम करत राहील असाही एक हेतू असतो. म्हणजेच जो जास्त काळ कंपनीबरोबर राहणार तो अधिक पैसे कमवणार असं सरळ गणी म्हणता येईल. 

स्टार्टअपकडून दिला जणारा सर्वाधिक ईएसओपी

भारतामधील स्टार्टअप कंपन्यांपैकी स्वीगीकडून दिला जाणारा ईएसओपी हा सर्वाधिक ईएसओपीपैकी एक आहे. यापूर्वी फ्लिपकार्टने कर्मचाऱ्यांना जुलै 2023 मध्ये ईएसओपी म्हणून 5800 कोटी रुपये वाटले होते. हे पैसे फ्लिपकार्टने 17 हजार कर्मचाऱ्यांना वाटले होते. 

मागील महिन्यातच या कर्मचाऱ्यांना मिळालेत 1600 कोटी

इतरही कंपन्या ईएसओपीच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांना नफा मिळवून देत असल्या तरी फ्लिपकार्ट आणि स्वीगीच्या आसपास इतर कोणतीही कंपनी नाही. स्वीगीचे सहसंस्थापक श्रीहर्ष मजेती, नंदन रेड्डी, पहानी किशन, मुख्य कार्यकारी अधिकारी रोहित कपूर, स्वीगी इन्स्टामार्टचे प्रमुख अमितेश झा, सीएफओ राहुल बोथारा, एचआर हेड गिरीश मेनन, सीटीओ मधुसूदन राव आणि इतर कर्मचाऱ्यांना 1600 कोटींचा फायदा आयपीओ येण्याआधी ईएसओपीच्या माध्यमातून झालेला, असं मागील माहिन्यात 'मनीकंट्रोल'ने दिलेल्या वृत्तात म्हटलेलं.